Shiv Sena MP Sanjay Raut In Nashik : केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेची वाद चिघळलेला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. आता नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते म्हणाले की, आता फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही. Shiv Sena MP Sanjay Raut In Nashik Addressed To Party Workers Criticizes Narayan Rane BJP
विशेष प्रतिनिधी
नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेची वाद चिघळलेला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. आता नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते म्हणाले की, आता फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही.
नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना संजय राऊत यांनी संबोधित केलं. राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये शिवसेनेचं वातावरण आहे. सरकारला नाशिकसारख्या शहरांची ताकद मिळत राहिली पाहिजे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून टाकू. कार्यक्रम केल्यावर परिणामांची पर्वा करत नाही.
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हे उत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. भाजपचा एक तरी मुख्यमंत्री पहिल्या पाचात आहे का? मी ठाकरे आहे. माझ्या डीएनएमध्ये राजकारण आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्यात काल बंद दाराआड चर्चा झाली. सगळ्यांना माहिती आहे काय चर्चा झाली!
संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्ही नारायण राणेंना भाजपाचे मानत नाही. भाजप जर त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवणार असेल तर आमच्याकडेही अनेक खांदे आहेत. आम्ही तुम्हाला राजकीय खांदा द्यायला तयार आहोत. राणेंचा आम्ही दोनदा पराभव केला. सत्तेत आल्यावर माणूस सज्जन होतो. त्यांनी हे भान ठेवायला हवं. तुम्ही भान सोडलं तर आम्हाला बेभान व्हावं लागेल. महाराष्ट्रावर यापुढेही सेनेची सत्ता राहील. आज सरकार तीन पक्षांचं आहे, उद्या काय सांगता येत एका पक्षाचं येऊ शकतं.
राऊत पुढे म्हणाले की, हे म्हणतात तुमच्या कुंडल्या काढू. तुम्हाला कुंडल्या नाहीत का? आम्ही तुमचे संदुक उघडलं तर काय बाहेर पडेल हे लक्षात ठेवा. जठार छत्रपती संभाजी महाराजांची राणेंशी तुलना करतात. ज्यांनी राणेंच्या विरोधात आयुष्य घालवलं, ते हे विधान करत आहेत. सेनेतून अनेक जण गेले, पण यांच्यासारखा ऊतमात कोणी केला नाही. पण उद्धवजींनी सांगितलं, वेडंवाकडं केलं तर सोडणार नाही. ज्या हिमतीने तुम्ही ही लढाई लढता आहात, त्यासाठी मी नाशिकला आलोय. गुन्हा दाखल करण्याचं हिमतीच काम नाशिकमध्येच होऊ शकत, हे मला माहिती होतं, असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांचं कौतुकही केलं.
Shiv Sena MP Sanjay Raut In Nashik Addressed To Party Workers Criticizes Narayan Rane BJP
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App