शिवसेना नेत्याची अमृतसर मध्ये हत्या; मारेकऱ्यांच्या कार वर खलिस्तानी स्टिकर्स

वृत्तसंस्था

अमृतसर : पंजाबमध्ये अमृतसर येथे शुक्रवार शिवसेनेचे नेते सुधीर सुरी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करून त्यांची हत्या केली आहे. ही घटना अमृतसरमधील गोपाल मंदिर परिसरात घडली आहे. Shiv Sena leader killed in Amritsar

सुरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पण सुधीर सुरी ज्या शिवसेनेचे नेते होते, तिचा महाराष्ट्रातील शिवसेनेशी काही संबंध नाही. गोळ्या झाडणार्‍या तीन मारेकऱ्यांच्या कार वर खलिस्तानी स्टिकर्स होते.

अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार

अमृतसरच्या गोपाल मंदिराबाहेर कच-यात देवांच्या मूर्ती सापडल्यामुळे त्या विरोधात सुधीर सुरी यांनी मंदिराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले होते. याचवेळी गर्दीतून अज्ञात इसमाने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर सुरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून एका हल्लेखोराला अटक करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. मारेकऱ्याच्या कारवर खलिस्तानी स्टिकर्स होते.

पूर्वीही रचला होता मारण्याचा कट

गेल्या काही दिवसांपासूनच सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये 4 गॅंगस्टर्सना अटक केली होती. यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत हा खुलासा झाला होता. सुधीर सुरी यांच्यावर दिवाळीपूर्वीच हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता, असे चौकशीत उघड झाले होते. अटक करण्यात आलेले गँगस्टर्स हे रिंदा आणि लिंडा टोळीतील होते.

Shiv Sena leader killed in Amritsar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात