विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेची सोनिया सेना झालेली आहे. भाजपाने कधीही रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यास पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे येत्या सात दिवसांमध्ये आपली चूक महाराष्ट्रासमोर आणा, अन्यथा आपल्याविरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला जाईल, असा इशारा भाजपचे आमदार अमित साटम यांनी शनिवारी दिला.Shiv Sena is now Sonia Sena, BJP’s target after naming Deonar Udyan in Mumbai named after Tipu Sultan
समाजवादी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका रुक्साना सिद्दिकी यांनी देवनार येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव आणला आहे. मात्र यावरून भाजप विरुद्ध शिवसेना असे राजकारण रंगले आहे.
यामध्ये महापौर यांनी उडी घेत २०१३ मध्ये शिवाजीनगरमधील रस्त्याला टिपू सुलतान असे नाव देण्याचा ठराव स्थापत्य उपनगरे समिती व महापालिकेत करण्यात आला. त्या वेळी शिवसेनेबरोबर भाजप सत्तेत असताना त्यांनी विरोध केला नव्हता. भाजप सोयीनुसार राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता.
यावर प्रत्युत्तर देत, आपली सुलतानवरील श्रध्दा झाकण्यासाठी हिंदुहृदयसम्राटांच्या नावाचा आधार आपण घेतच आहात. माझेही नाव बनावट कागदपत्राच्या आधारे दाखवून आपले खोटे बोलणे रेटत आहात, असा संताप अमित साटम यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App