विनायक ढेरे
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार फुटल्याने शिवसेनेची पुरती राजकीय वाताहत झाली आहे… भले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा देऊन खरा शिवसैनिक आमच्याकडे आहे, असे म्हणत असले तरी शिवसेना संघटनात्मक पातळीवर फारच कमकुवत झाल्याचे दिसत आहे. Shiv Sena is hurt by Shinde’s split; But political booster dose to Uddhav Thackeray family too!
पण त्या पलिकडे जाऊन बाळासाहेब ठाकरे हयात असताना आणि अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ठाकरे कुटुंबातली जी एकजूट निदान राजकीय दृष्ट्या तरी दिसत होती, ती देखील आता विस्कळीत झाली आहे. किंबहुना एकनाथ शिंदे यांच्या फुटी उद्धवेतर ठाकरे कुटुंबाला, म्हणजे उद्धव ठाकरे यांचे कुटुंब सोडून इतर ठाकरे कुटुंबीयांना राजकीय बूस्टर डोस मिळाल्यासारखे झाले आहे.
राज ठाकरे स्वयंप्रज्ञ
राज ठाकरे यांचा यात प्रश्न नाही. ते स्वयंप्रेरणेने आपली राजकीय साख राखून आहेत. पण बाकीचे जे ठाकरे कुटुंबीय आहेत त्यामध्ये स्मिता जयदेव ठाकरे आणि निहार बिंदूमाधव ठाकरे हे जे दोन ठाकरे झाकोळले होते त्यांना राजकीय बूस्टर डोस मिळाल्यासारखे झाले आहे!!
स्मिता, निहार ठाकरे यांची वर्षा भेट
स्मिता ठाकरे यांनी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षावर जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. आज निहार बिंदूमाधव ठाकरे यांनी पत्नी अंकिता हर्षवर्धन पाटील हिच्यासह वर्षा निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांचे सासरे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे निहार आणि अंकिता यांच्या समवेत वर्षावर पोहोचले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर स्मिता जयदेव ठाकरे आणि निहार बिंदूमाधव ठाकरे हे दुसऱ्यांदा शिंदे यांना भेटले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अखंड शिवसेना सामील असताना स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे हे तितकेसे पॉलिटिकली ऍक्टिव्ह नव्हते. पण शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र ते सार्वजनिक जीवनात वावरू लागल्याचे दिसत आहे. त्यातही शिंदे यांच्याशी राजकीय जवळीक झाल्याचेही दिसून येत आहे. निमित्त मात्र गणेश दर्शनाचे आहे.
कौटुंबिक वादाला वेगळे परिमाण
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे वगळून इतर ठाकरे कुटुंबीयांना असा राजकीय बूस्टर डोस मिळणे याला विशेष महत्त्व आहे. शिवसेनेत अंतर्गत वाद होते आणि आहेत. तसेच वाद ठाकरे कुटुंबीयांमध्येही वर्षानुवर्ष राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात असताना या वादाचे परिणाम राजकीयदृष्ट्या फारसे दिसले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसेनेवर आपली पकड मजबूत ठेवून आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदावर राहून कौटुंबिक वादाचे परिणाम फारसे होऊ दिले नव्हते.
परंतु, आता शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर फाटाफूट झाली आहे. उद्धव ठाकरे वगळून इतर ठाकरे देखील पॉलिटिकली ऍक्टिव्हेट झाले आहेत. याचा परिणाम उद्धव, आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्या राजकीय यशावर होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर ठाकरेंच्या कौटुंबिक वादाला या निमित्ताने एक वेगळे राजकीय परिमाण लाभण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App