अलिखित करार मोडून काँग्रेसने शिवसेना फोडली; विदर्भातले माजी मंत्री अशोक शिंदे यांना काँग्रेसमध्ये घेतले

प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात अलिखित करार आहे. एकमेकांचे पक्ष फोडायचे नाहीत आणि एकमेकांच्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही. परंतु हा अलिखित करार काँग्रेसने आज मोडला. Shiv sena former minister ashok shinde given entry in Congress

विदर्भातल्या हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा शिवसेनेचे आमदार राहिलेले अशोक शिंदे यांना शिवसेनेतून फोडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षात प्रवेश दिला आहे. अशोक शिंदे हे शिवसेना – भाजप युतीचे पहिले सरकार असताना मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. शिवसेनेतून त्यांनी तीन वेळा आमदारकी भूषविली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला.

त्यानंतर शिवसेना नेतृत्वाने आपल्याकडे दुर्लक्ष केले हे कारण दाखवून अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी दाखविली. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले आहे. या तीनही पक्षांमध्ये एकमेकांचे पक्ष सध्या फोडायचे नाहीत, असा अलिखित करार आहे. हा करार मध्यंतरी अहमदनगर मधील राष्ट्रवादीचे आमदार रवी लंके यांनी मोडला होता. त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला होता. परंतु_ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर सर्व नगरसेवकांना शिवसेनेत परत यावे लागले होते.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक शिंदे यांच्या रूपात शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना थेट काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याने शिवसेनेतून आता कोणती प्रतिक्रिया उमटते हे पहावे लागेल.

Shiv sena former minister ashok shinde given entry in Congress

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात