विशेष प्रतिनिधी
अकोला : शिवसेना, काँग्रेसला मिरवायला हवे, लग्न नको म्हणतात अशी टीका करत वंचित बहुजन आघाडीने आपले पर्याय नेहमीच खुले ठेवले आहेत. काँग्रेसला यापूर्वी अनेकदा मैत्रीचा प्रस्ताव दिला तसेच शिवसेनेचेही आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकदा भेटलोही होतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबतची चर्चा आघाडीच्या वळणावरही आली होती, मात्र ती पुढे गेली नसल्याचे अॅड प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.Shiv Sena, Congress should be persuaded, they say no to marriage, Ambedkar’s offer
आम्ही शिवसेनेबाबत सकारात्मक आहोत. काँग्रेसबाबतही आपली हीच भूमिका राहिली आहे. पण दुदैर्वाने या दोन्ही पक्षांना आम्हाला राज्यभर फिरवायला आवडते. आपल्यासोबत कुणीच लग्न करायला तयार नाही, अशा शब्दांत टीका करताना अॅड. आंबेडकर म्हणतात, शिवसेना-भाजपाचा जसा काडीमोड झाला आहे तशी आमची स्थिती नाही. शिवसेनेसोबतही जायला आम्हाला नक्कीच आवडेल.
मनेसेचे नेते राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात शासनाला दिलेला अल्टिमेटम ही धमकी आहे. गृहमंत्र्यांनी तत्काळ राज यांच्यावर करवाई केली पाहिजे. मात्र राज्य सरकार अशा कारवाईसाठी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. हनुमान चालिसा अवश्य लावा, वाजवा तो त्यांचा अधिकार आहे. पण केवळ दंगली घडविण्यासाठीच हनुमान चालिसा विशिष्ट ठिकाणी वाजविण्याचा आग्रह हा घातक असल्याचे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App