विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवजयंतीच्या तारखेचा आणि तिथीचा वाद आज पुन्हा एकदा विधिमंडळात गाजला. पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी या सगळ्या पक्षांच्या आमदारांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करीत शिवप्रतिमेला विधिमंडळात अभिवादन केले. Shiv Jayanti : Uddhav Thackeray, Raj Thackeray celebrate shiv jayanti according to hindu panchang tithi
भाजपचे नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तिथीनुसार शिवजयंतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे ठाकरे – पवार सरकारची अडचण झाली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. त्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा येथे शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी केली. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी रश्मी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब हे होते.
हा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरला. याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. रेकॉर्डनुसार १९ फेब्रुवारीला सरकारी पातळीवर शिवजयंती साजरी केली जाते. पण कोणालाही तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला हरकत नाही. पण सरकारी शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते. उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून शिवजयंती साजरी करीत आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते, असे उत्तर अजित पवारांनी दिले.
🙏🏼 pic.twitter.com/OuGWV2QnSl — Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 21, 2022
🙏🏼 pic.twitter.com/OuGWV2QnSl
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 21, 2022
मात्र, उध्दव ठाकरे यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी केल्याने महाविकास आघाडीची चांगलीच पंचाईत झालेली दिसली. सर्वपक्षीय आमदारांनी तिथीनुसार शिवजयंती केल्याने अजित पवारांना सरकारी शिवजयंती विषयी स्पष्टीकरण द्यावे लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App