सगळ्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची निवडणूक आयोगाकडून चौकशी आणि तपास; तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सेलिब्रेशन!!

Shinde's Shiv Sena

विशेष प्रतिनिधी

ठाणे : सगळ्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची चौकशी निवडणूक आयोगाने लावली, तरी शिवसेनेने मात्र ठाण्यात बिनविरोधकांचे सेलिब्रेशन उरकून घेतले. महाराष्ट्रात 29 महापालिकांमध्ये 65 नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यांच्या विरोधातले सगळे अर्ज मागे घेतले गेले ते का आणि कसे मागे घेतले??, याची चौकशी निवडणूक आयोगाने लावली. त्याचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. पण या चौकशीचे अहवाल येण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ठाण्यात सेलिब्रेशन उरकून घेतले.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना – भाजपा – रिपब्लिकन सेना महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. शिंदे यांनी या सर्वांचे अभिनंदन करून भावी यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यामध्ये सुखदा मोरे, जयश्री फाटक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, शीतल ढमाले, एकता भोईर आणि राम रेपाळे यांचा समावेश होता. या ककनवेळी विजयी उमेदवारांच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मला सन्मानित करण्यात आले. या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी आता इतर प्रभागातील शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रयत्नशील रहावे अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, विभागप्रमुख एकनाथ भोईर, शिवसेना उमेदवार दीपक वेतकर, प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Shinde’s Shiv Sena’s celebration

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात