Shinde Slams Thackeray : शिंदेंची ठाकरेंवर टीका- 3 वर्षांपासून फक्त शिव्या-शाप सुरू; एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही

Shinde Slams Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Shinde Slams Thackeray विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. 3 वर्षांपासून माझ्या नावाने फक्त शिव्या-शाप सुरू आहेत. सभागृहात दोन दिवस चर्चा जाळली, मी अंबादास यांचे कौतुक करत होतो, कोणाला काय इतके लागण्याचे कारण नव्हते. पावसाळ्यात छत्र्या उगवतात की बेडूका, परंतु एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.Shinde Slams Thackeray

देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला

ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला, ज्यांना संपलेला बोलले, त्यांच्याच सोबत आता रोज जात आहेत. चल मेरे भाई हात जोडता हूं, या गाण्याची आठवण होत आहे, असे म्हणत खोचक टीका केली आहे. तसेच देवेंद्रजी यांना किती शिव्या दिल्या याचे साक्षीदार आम्ही आहोत. जनतेने शिवसेना भाजपला मतदान केले होते. आम्ही ताटात माती कशी कालवली? माती तर तुम्ही केली, देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, असे शिंदे म्हणाले.Shinde Slams Thackeray



पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्रजी यांनी अनेक फोन केले, पण फोन उचलला नाही. केलेले इथेच फेडावे लागते. मुंबईचे महापौरपद देवेंद्र फडणवीस यांना मिळाले होते, तेव्हा अर्ध्या तासात त्यांनी महापौरपद शिवसेनेला दिले. पण, परतफेड न करता दगाबाजी केली. साधा फोन उचलायचा असता, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केले लक्ष्य.

..तेव्हा मी ठरवले की आता कार्यक्रम करायचा

देवेंद्रजींना बोलले एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, कट कारस्थान करून आत टाकायचा प्रयत्न केला. तेव्हा मी ठरवले की आता कार्यक्रम करायचा. माझ्यावर टीका करायच्या आधी तुमच्याकडे तीन बोट येतात. मुख्यमंत्री यांच्याकडे सगळेच जातात, किती द्वेष. मी सर्वसामान्य कुटुंबाचा मुलगा मुख्यमंत्री झाला. इतकी पोटदुखी असता कामा नये. हे जे काही सुरू आहे, ते पाहून देवेंद्रजी मनातल्या मनात हसत असतील, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झाला बहुदा

एकीकडे आरएसएसला टोमणे मारायचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित भाईंना शिव्या द्यायच्या. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना बुके द्यायचा. केमिकल लोचा झाला बहुदा, असा टोलाही एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना लगावला. पुढे ते म्हणाले, किती कोतेपणा आहे, आपण लता मंगेशकर संगीत महाविद्यालय करणार होतो. 24 एप्रिल 2022 रोजी हृदयनाथ मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला लता मंगेशकर पुरस्कार दिला आणि तिथेच पापड मोडला. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम झाला, तिथं हे आले नाहीत. नरेंद्र मोदीबाबत यांच्या मनात किती द्वेष आहे, याचे साक्षीदार उदय सामंत आहेत.

मी छेडत नाही पण मला छेडले तर मी सोडत नाही

जळी-स्थळी काष्ठी पाषाणी मी दिसतोय. 3 वर्षांपासून रोज शिव्या शाप, आरोप, मत्सर एकच कॅसेट रोज ऐकतोय. पद येतात-जातात पण एकनाथ शिंदेला अडीच कोटी महिलांचा भाऊ ही उपाधी मिळाली. आम्ही गुवाहाटीला असताना निरोप यायचे, दुसरीकडून दिल्लीत संधान साधायचे की यांना घेऊ नका, आम्ही येतो हे चालले होते. आम्ही सत्ता सोडून गेलो, मी छेडत नाही पण मला छेडले तर मी सोडत नाही. सत्ता आणि खुर्चीसाठी अनेकांनी तडजोड केली, मी करणार नाही असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

Shinde Slams Thackeray: Hypocrisy, Betrayal in Maharashtra Politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात