विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शिंदे सेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह दिला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे. Shinde Sena
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरीभाऊ पाटील गोरेगावकर यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह हिंगोली आणि अमळनेरमधील अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिरीष चौधरी यांच्यासह उबाठा गटाचे अमळनेरचे माजी नगरसेवक गुलाब पाटील, माजी शहरप्रमुख प्रवीण पाठक, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल महाजन, माजी सभापती श्रीराम चौधरी, माजी सभापती देविदास महाजन, माजी नगरसेवक पंकज चौधरी, महेश जाधव, किरण बागुल, बाळासाहेब संघनाशिव, साखरलाल महाजन आणि इतर असंख्य पदाधिकाऱ्यांनी हाती भगवा घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
– हिंगोली + यवतमाळ मधून पक्षप्रवेश
तर हिंगोलीमधील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कांतराव हराळ, माजी शिक्षण सभापती भय्या देशमुख, माजी सभापती बाजीराव जुमडे, माजी उपसभापती मदन इंगोले, डॉ.आर. जी.कावरजे, द्वारकादास सारडा, न्यानोबा कवडे आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह बसला.
तसेच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने स्थानिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार संतोष बांगर, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सूर्यवंशी, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमख वासुदेव पाटील, शिवसेना सचिव संजय मोरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App