विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेला खिंडार पाडले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण मुंबई, मलबार हिल विधानसभा प्रभारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना अध्यक्ष परेश तेलंग यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यासोबतच मुंबईतील सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्राचे विभाग अध्यक्ष अनंत कांबळे, उपविभाग सचिव सचिन चिकाटे, माजी शाखा सचिव लक्ष्मण कुंचीकोरवे, उप शाखाध्यक्ष सुरेश कांबळे, मनसे शाखाध्यक्ष शंकर कवितकर, माजी शाखाध्यक्ष रामचंद्र देवेंद्र, उप शाखाध्यक्ष प्रशांत इंगवले, राजू गायकवाड, गणेश गुरुराम यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
त्याचप्रमाणे धारावी विधानसभा क्षेत्रातील मनसे विद्यार्थी सेना विभाग सचिव बालनितीन बाडार, उपविभाग अध्यक्ष एस.जे.रॉबर्ट बाडार, उपविभाग अध्यक्ष कबीर राज, उपविभाग अध्यक्ष महेंद्र कोलड्री यांनी देखील भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक संजय घाडी, बाळकृष्ण ब्रिद हेदेखील उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दुसऱ्या माजी नगरसेविका सौ.स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी काल आपल्या समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे यादेखील उपस्थित होत्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App