विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महायुती सत्तेवर असली तरी पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवायची वेळ आली, तर कोणत्या प्रकारची रणनीती आखावी लागेल??, याची चाचपणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी आज केली.Shinde Sena tests its strength in western Maharashtra
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच मुंबई येथे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथील पदाधिकाऱ्यांसमवेत शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या च्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठका झाल्या, त्याच पद्धतींने आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली येथील प्रमुख पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर करण्यात येतील. या अनुषंगाने सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिवसेनेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध कामांचा आणि पक्षबांधणीचा ही यावेळी आढावा घेतला. तर आगामी पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जोमाने काम करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, आनंदराव अडसूळ, ज्येष्ठ नेत्या मीनाताई कांबळी, आमदार विजयबापू शिवतारे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे, राम रेपाळे यांच्यासह पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, या विभागातील सर्वश्री जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या असतील, तर पक्ष नेतृत्वाने तसे पाठबळ कार्यकर्त्यांच्या मागे उभे केले, तर संघटना वाढवून निवडणुका सुद्धा जिंकता येतील, असा आत्मविश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचवून त्यांचा लाभ मतदारांना देण्यावर सर्व नेत्यांनी भर दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App