शिंदे गटाच्या 7 मंत्र्यांची नाराजी; पण अजितदादांना आणि त्यांच्या मंत्र्यांना नाराज होणे परवडेल का??

नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले 7 मंत्री नाराज झाले आणि त्यांनी ती नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांच्या दालनात जाऊन उघडपणे बोलून दाखविली. तशा बातम्या मराठी माध्यमांमधून समोर आल्या. शिंदे गटातल्या मंत्र्यांच्या नाराजीच्या कारणांची मीमांसा सुद्धा माध्यमांनी वेगवेगळ्या प्रकारे केली.

राज्य मंत्रिमंडळाची नियमित बैठक आज झाली. त्या बैठकीला दादा भुसे, प्रताप सरनाईक, उदय सामंत, भरत गोगावले, संजय शिरसाट, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील हे मंत्री गैरहजर होते. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसून होते अशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये आल्यात.

पण ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे सात मंत्री नाराज होऊन गैरहजर राहिले त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हजर राहिले.

– एकनाथ शिंदेंना त्रास दिल्याबद्दल नाराजी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भाजप मधल्या इनकमिंग बद्दल आणि शिवसेनेतल्या आउटगोइंग बद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. कल्याण डोंबिवली सारख्या एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे नेते मुद्दामून त्यांना त्रास देत आहेत त्यांच्या पक्षातली माणसे फोडून भाजपमध्ये घेत आहेत असा आरोप या नाराज मंत्र्यांनी केला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले कल्याण डोंबिवलीत आम्ही जे करतो तेच तुम्ही उल्हासनगर मध्ये करत आहात, असा प्रत्यारोप देवेंद्र फडणवीस यांनी केला तशा बातम्या मराठी माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर आल्या. परंतु या सगळ्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने होत्या.

– अजितदादा आणि राष्ट्रवादीचे मंत्री हजार

पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नाराज झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या नाहीत. कारण आणि त्यांचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होते.

– अजितदादांच्या मंत्र्यांची हिंमत का नाही??

वास्तविक अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आउटगोइंग सुरू आहे. त्याचबरोबर इनकमिंग सुद्धा सुरू आहे तरीसुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने किंवा त्यांच्या मंत्र्यांनी भाजप विरुद्ध कुठली तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली नाही. कारण अजित पवारांचे आणि त्यांच्या मंत्र्यांचे हात दगडाखाली अडकलेत. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याची चौकशी आणि तपास ऐन मध्यावर आलाय. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यातली जमीन प्रत्यक्ष बघण्यासाठी म्हणजेच पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या बोटॅनिकल गार्डनपाशी अंजली दमानिया आजच सकाळी गेल्या होत्या. परंतु त्यांना ती जमीन पाहण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला. त्यामुळे पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याचा विषय पुन्हा चर्चेला आला.

– राष्ट्रवादीच्या मनात भीती

पार्थ पवारचा जमीन घोटाळा आणि राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांचे अनेक घोटाळे यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची किंवा खुद्द अजितदादांची देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उघडपणे नाराजी व्यक्त करायची राजकीय हिंमत नाही. तशी नाराजी ते व्यक्त करू नाहीत. त्यांनी नाराजी व्यक्त केली तर त्याची फार मोठी राजकीय आणि कायदेशीर किंमत अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि खुद्द अजितदादांना चुकवावी लागेल. हाताला कशीबशी लागलेली सत्ता गमवावी लागेल, याची पक्की भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात बसली आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या बातम्या बाहेर कुठे आल्या नाहीत. पार्थ पवारचा जमीन घोटाळा बाहेर आला, त्यावेळी फक्त सुरुवातीला अजितदादांनी थेट राजीनाम्याची ऑफर देऊन राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, अशी दमबाजी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु, सूत्रांच्या हवाल्याच्या पलीकडे त्या बातम्यांना फारशी किंमत नव्हती. पण अजित पवार यांना दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून सगळा खुलासा करावा लागल्याच्या बातम्या सुद्धा नंतर आल्या होत्या. त्यामध्ये सगळे राजकीय इंगित दडले होते.

– शिंदे तसे बेधडक

पण एकनाथ शिंदे यांचे राजकारण तसे बेधडक आहे. त्यांचे आणि त्यांच्या मंत्र्यांचे जरी अनेक घोटाळे असले तरी भाजपशी भिडायला त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी भीती वाटत नाही. शिवाय एकनाथ शिंदे यांनी स्वतः जरी नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या नाहीत, तरी त्यांनी शिवसेनेच्या 7 मंत्र्यांमार्फत नाराजी व्यक्त करून भाजपच्या श्रेष्ठींपर्यंत सुद्धा व्यवस्थित political message पोहोचविल्याचे बोलले जात आहे.

Shinde Sena ministers angry over BJP splitting Shivsena

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात