विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shinde भाजप-शिंदेसेनेत पदाधिकारी फोडाफोडीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. नाव न घेता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, गुरुवारी शिंदेंनी नवा पवित्रा घेतला. मित्रपक्षातून शिंदेसेनेत येणाऱ्यांना थांबवा, असे आदेश त्यांनी शिवसेना नेते, मंत्र्यांना दिले आहेत.Shinde
सूत्रांनी सांगितले की, शिंदेसेनेचे मंत्रीही काही ठिकाणी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी फोडत असल्याचे अप्रत्यक्षपणे शाह यांनी सूचित केले. त्यामुळे शिंदेंनी ठाणे, रत्नागिरी, मराठवाडा, नवी मुंबई, रायगड भागातील भाजपचे इनकमिंग रोखण्याचे आदेश दिले. मी तक्रारींचा पाढा वाचत रडणारा नव्हे, लढणारा आहे. राज्यातील छोटे-मोटे वाद आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो, असा दावा त्यांनी केला. तर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नगरविकास खात्याविषयीचे प्रश्न घेऊन शिंदे शाहांना भेटले होते.Shinde
राजकीय वातावरण तापले असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापूंवर उत्तरांचे सत्र सुरू केले. गेल्या पाच वर्षांत सांगोल्यात मोठ्या प्रमाणात निधी आला, तरी विकास दिसत नाही, असा प्रश्न गोरे यांनी उपस्थित केला. शिवाय नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आधी जाहीर करून नंतर युतीबाबत चर्चा सुरू केल्याचा आरोपही त्यांनी पाटील यांच्यावर केला. या प्रतिउत्तरानंतर वातावरण आणखी ताणले असतानाच शहाजीबापूंनी आपली नाराजी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त करायला सुरुवात केली आहे. सांगोल्यात जे घडत आहे ते मुख्यमंत्री पाहत नाहीत का? असा थेट प्रश्न त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
शहाजीबापूंनी यावेळी एक धक्कादायक बाब मांडली. लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी त्यांनी उपचार पुढे ढकलले आणि त्यामुळे साधा आजार गंभीर अवस्थेत पोहोचला, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीचा काळ तीन महिने मी आजार लांबवत राहिलो. उपचार केले असते तर आज स्थिती वेगळी असती. पण पक्षाची जबाबदारी आणि मान राखण्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले. भाजपच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळावी यासाठी त्यांनी स्वतःच्या आरोग्याची पर्वा केली नाही; मात्र आज त्याच पक्षाने सांगोल्यात त्यांच्या पाठिशी उभे न राहणे अत्यंत दुःखद आहे. ही नाराजी त्यांनी पहिल्यांदाच एवढ्या स्पष्ट शब्दांत व्यक्त केली.
भाजपसोबत काम केले, योगदान दिले, तरीदेखील अन्याय
शहाजीबापू पाटील यांनी असेही सांगितले की, भाजपसोबत दीर्घकाळ प्रामाणिकपणे काम केले असून लोकसभेत मोठे योगदान दिले, तरीदेखील त्यांच्यावर अन्याय झाला. ज्याचे त्याचे कर्म त्याच्या सोबत, असे म्हणत त्यांनी भाजपला स्वच्छ संदेश दिला की राजकारणात विश्वासाला तडा गेला तर साथ देणे कठीण होते. आगामी निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका काय असेल याची चर्चा सांगोला तालुक्यात सुरू झाली आहे. शहाजीबापूंनी केलेले भावनिक भाषण आणि भाजपवर केलेली टीका ही निवडणुकीच्या काही दिवसांआधी येत असल्यामुळे घडामोडी आणखी रोमहर्षक बनल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App