शिंदे-फडणवीस सरकारकडून बळीराजासाठी आनंदाची बातमी; राज्यमंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांनी दिली महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेषता आपल्या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांपैकी काही घोषणांच्या अंमलबजावणीचे निर्णय, आज करण्यात आले आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: माहिती दिली. Shinde Fadnavis government will give 6 thousand rupees from Namo Shetkari Samman Yojana

फडणवीस म्हणाले, नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतात.  त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील सहा हजार रुपये देणार आहे. या योजनेला आज मान्यता मिळालेली  आहे. आता जवळपास एक कोटी लाभार्थींना, सहा हजार रुपये हे जसजसं केंद्र सरकार त्यांचे पैसे देईन, त्याचवेळी राज्यसरकार देखील आपले पैसे देईन. म्हणजे आता शेतकऱ्यांना १२ हजार रुपये हे पंतप्रधान मोदी आणि नमो योजनेतून मिळणार आहेत.

याशिवाय आपण अर्थसंकल्पात आणखी एक घोषणा केली होती. ती म्हणजे १ रुपयात पीक विमा. आज त्याही योजनेला मान्यता मिळालेली आहे. आता पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना हिस्सा भरण्याची आवश्यकता पडणार नाही, केवळ रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यांनी रजिस्ट्रेशन करावं म्हणून एक रुपया त्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. १ रुपयात त्यांनी रजिस्ट्रेशन केलं की त्यांना पीक विमा मिळणार आहे. अशी माहिती फडणवीसांनी दिली.

यासोबत पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन जे सहा जिल्ह्यांपुरतं मर्यादित  होतं. आपण अर्थसंकल्पात घोषणा केली होती, त्याप्रमाणे आता ते मिशन संपूर्ण राज्यासाठी आपण लागू केलं आहे. १९०० कोटी रुपये आपण त्यासाठी दिलेले आहेत. यामध्ये नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत पुढीच्या काही वर्षांत २५ लाख हेक्टर जमीन आपल्याला आणायची आहे. पहिल्या टप्प्यात १३ लाख शेतकरी आपण प्रशिक्षत करतो आहोत आणि विविध गटं त्या ठिकाणी तयार करत आहोत, या गटांना नैसर्गिक किंवा जैविक शेतीसाठी प्रमाणिकरण करण्यासाठी प्रयोगशाळा आपण देत आहोत. हजाराच्या वर प्रयोगशाळा राज्यात  तयार होतील,  की ज्या जैविक खतांच्या संदर्भात किंवा इतर निविष्ठांच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रमाणीकरण करतील. जेणेकरून जो माल तयार होईल,त्याचं प्रमाणीकरण तयार राहील. हा देखील निर्णय घेण्यात आला आहे. असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Shinde Fadnavis government will give 6 thousand rupees from Namo Shetkari Samman Yojana

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात