प्रतिनिधी
मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्प विषयात शरद पवारांनी लक्ष घातल्यानंतर आंदोलनकर्ते नेते सत्यजित चव्हाण यांनी पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेट घेतली. त्यानंतर आता शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांचे भेट घेतली आहे. या सगळ्या भेटीगाठींमधून शिंदे – फडणवीस सरकारने काट्याने काटा काढायचे ठरवल्याचे दिसत आहे. Shinde – BJP’s efforts to remove thorn from Pawar-Samant meeting
बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत शरद पवारांनी सावध भूमिका घेतली आहे. पण उद्धव ठाकरेंची भूमिका कठोरपणे प्रकल्पाविरोधात विरोधात चालली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना थेट आपल्या अंगावर घेण्यापेक्षा त्यांचा काटा पवारांच्या काट्याने काढण्यावर शिंदे – फडणवीस सरकारने भर दिला आहे. यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची फोनवर चर्चा केली आणि उदय सामंत यांना पवारांकडे शिष्टाईसाठी पाठविले.
उदय सामंत यांनी बारसूतील सर्व परिस्थिती पवारांना सांगितली. तिथे सध्या माती परीक्षण सुरू आहे. माती परीक्षण झाल्यानंतर कंपनी शास्त्रीय आधारावर तिथे प्रकल्प सुरू करायचा किंवा नाही याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे आंदोलन कर्त्यांच्या मागणीनुसार कुठलाच निर्णय ताबडतोब होणे शक्य नाही, याची उदय सामंत यांनी शरद पवारांना कल्पना दिली. ही माहिती स्वतः उदय सामंत यांनीच पवारांच्या भेटीनंतर पत्रकारांना दिली.
उद्धव ठाकरे यांची प्रकल्पाबाबतची ताठर भूमिका लक्षात घेता त्यांच्याशी कुठल्या चर्चा अथवा वाटाघाटी करण्यापेक्षा शिंदे – फडणवीस सरकारने शरद पवारांनाच हाताशी धरून उद्धव ठाकरे यांची प्रकल्पाच्या विरोधातली हवा काढून विरोध सौम्य करून हा प्रकल्प पुढे रेटण्यासाठी काट्याने काटा काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App