विशेष प्रतिनिधी
पुणे : पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात पोलिसांनी शितल तेजवानीला मुख्य आरोपी बनवले असून तिला आज अटक केली पण पार्थ पवार अजून मोकळाच राहिला.Sheetal Tejwani arrested in Parth Pawar’s land scam; Parth is still free!!
मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळाप्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये, प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानीची या आधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई केली.
– शीतलची कोर्टात धाव, पण…
पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्या. गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी देखील झाली. मीडिया रिपोर्ट्समुळं आपणास लक्ष्य केलं जात असल्याचा दावा तेजवानीने याचिकेत केला होता. एफआयआर मीडिया रिपोर्टवर गुन्हा दाखल केला असून, मीडियात फरार घोषित करण्यात आल्याचा आरोप याचिकेत केला होता. दुसऱ्या जमिनीप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून तेजवानीची उपस्थिती आवश्यक असल्याचा युक्तिवाद देखील वकिलांनी केला होता. मुंढवा जमीन गैरव्यवहाराबद्दल आधी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलीस ठाण्यात दिग्विजय पाटील, शीतल मेजवानी आणि रविंद्र तारु यांच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, पुणे पोलिसांनी देखील यात उडी घेत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता, शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे.
– 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये
1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी
पुण्यात मुंढवा येथील 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली, तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप करण्यात आला होता. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवालही या निमित्ताने विरोधकांकडून उपस्थित केला. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासांत स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला होता. हे प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर संबंधित व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पार्थ पवार यांचे वडिल अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन दिली होती. दरम्यान, या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App