पवारांच्या माघारीने तारे फिरले; अनेकांच्या खाली सुरुंग लागले!!, कसे ते वाचा!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यानंतर राष्ट्रवादीतल्या सर्वोच्च नेतृत्वाचा पेच निळण्याऐवजी तो आणखी चिघळतोय की काय??, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण पवारांच्या माघारीने अनेकांचे तारे फिरले आणि त्यांच्याखाली सुरुंग लागले आहेत. Sharad Pawar’s poewr game; ajit Pawar supporters “out”, supriya sule supporters “in”

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या काही वक्तव्यातून हे सुरुंग नेमके कुठे आणि कसे लागलेत??, याचा सुराग मिळतो आहे. पवारांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊ नये यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते, असे वक्तव्य करून जयंत पाटलांनी राष्ट्रवादीत सर्व काही अजिबात आलबेल नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच पवारांच्या निर्णयाने नेमके कुणाच्या मनसूब्यांना नव्याने सुरुंग लागला आहे??, याची चर्चा राष्ट्रवादीच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे.



शरद पवारांच्या निर्णयामुळे अजित पवार नाराज झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी देऊन जुन्या झाल्या. त्यामध्ये तथ्यांश जरूर आहे, पण खरी बातमी त्या पलीकडची आहे. ती म्हणजे केवळ अजितदादाच नव्हे, तर अजितदादांचे समर्थक आता खऱ्या अर्थाने संघटनात्मक पातळीवर धोक्यात आले आहेत. स्वतः पवार आता जिल्हा पातळीपासून ते प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत फार मोठे फेरबदल घडवून आणणार आहेत आणि त्यामुळेच अजितदादांच्या समर्थकांच्या पोटात गोळा उठला आहे.

अजितदादांचे समर्थक आमदार 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीने तर धास्तावले आहेतच, कारण त्यांनाच भाजपबरोबर जाऊन आपल्या मागचे ईडी – सीबीआयचे शुक्लकाष्ट सोडवून घ्यायचे होते. त्याचबरोबर 2024 जाने निवडणुकीसाठी परस्पर भाजपकडून रसद मिळत असेल, तर ती घ्यायची होती. पण तूर्त तरी या दोन्ही गोष्टी पवारांच्या निर्णयामुळे थंड्या बस्त्यात गेल्या आहेत. अशावेळी राष्ट्रवादीतून देखील 2024 च्या निवडणुकीच्या तिकिटाची खात्री नाही आणि भाजपकडून पिढीचे शुक्लकाष्ट हटणार नाही. रसद मिळणे तर दूरच, अशा राजकीय कात्रीत अजितदादा समर्थक आमदार अडकले आहेत.

त्याचबरोबर या समर्थक आमदारांचे त्यांच्या तालुक्यातले आणि जिल्ह्यांमध्ये समर्थक पक्ष पदाधिकारी देखील आता फेरबदलाच्या शक्यतेने धास्तावले आहेत.

अजितदादा समर्थकांना डच्चू

कारण स्वतः पवार जेव्हा संघटनात्मक पातळीवर फेरबदल करतील तेव्हा अजितदादांचे समर्थक “निवडून” आणि “वेचून” खड्यासारखे बाजूला काढले जातील आणि नव्यांना संधी देण्याच्या नावाखाली तिथे सुप्रिया सुळे यांचे नवे समर्थक बसवून त्यांचे राजकीय बळ दिले जाईल. याचा अर्थ 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे समर्थक आमदारांचा गट जास्त प्रभावी करण्याचा शरद पवारांचा या संघटनात्मक फेरबदलाचा मूळ हेतू आहे. पवार येत्या 6 महिने ते वर्षभरात ही मोठी सर्जरी करण्याच्या बेतात आहेत आणि या सर्जरीत आपले भवितव्य कायमचे संपण्याची धास्ती अजितदादांच्या समर्थकांना वाटते आहे.

सुप्रिया समर्थकांची नवी फळी

पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेत सोनिया दुहान, आमदार संग्राम जगताप, रोहित पवार, धीरज शर्मा यांना मागे बसवून केवळ प्रतीकात्मकता दाखवली आहे. यापेक्षा पलीकडे फार त्याचा अर्थ आहे, असे समजण्याचे कारण नाही. पण जो खोलवर राजकीय अर्थ पवारांच्या वक्तव्यात दडला आहे, तो जिल्हा, प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवर स्वतः लक्ष घालून पवार फेरबदल करणार आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या फेरबदलातच सुप्रिया समर्थकांची मजबूत फळी उभी करून अजितदादांची महाराष्ट्रातली गेल्या 20 वर्षांमधली समर्थक फळी उध्वस्त करण्याचे सामर्थ्य आहे!! पवारांनी माघारीतून साधलेली ही “गेम” आहे!!

Sharad Pawar’s poewr game; ajit Pawar supporters “out”, supriya sule supporters “in”

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात