अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची; घड्याळापुढे शरणागती तुतारीची!!

Sharad Pawar

नाशिक : अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची; घड्याळापुढे शरणागती तुतारीची!!, हेच राजकीय चित्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या जाहीरनामा प्रकाशनाच्या निमित्ताने समोर आले.

काका – पुतण्या “समान”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या जाहीरनामा आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत प्रकाशित केला, त्या पत्रकार परिषदेची नेपथ्य रचना फार आकर्षक केली होती. ही पत्रकार परिषद दोन राष्ट्रवादींची मिळून एकच होती, पण प्रत्यक्षात तिच्या केंद्रस्थानी फक्त अजितदादाच होते. स्टेजच्या मागे पोस्टरवर शरद पवार आणि अजित पवार यांचे “समान” उंचीचे नमस्कार करतानाच्या पोजचे फोटो होते. जणू काही ते एकमेकांनाच “समानतेच्या” तत्त्वावर नमस्कार करत आहेत, असे चित्र निर्माण केले गेले होते. यातून पवारांच्या छत्रछायेखाली ही निवडणूक लढवली जात आहे, असे चित्र निर्माण होण्यापेक्षा दोन राष्ट्रवादी स्वतंत्रच आहेत, त्या फक्त एका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्यात, हेच चित्र अधोरेखित केले गेले. पवारांचे “पितामहत्व” इथे शिल्लक राहियाचेच दिसले नाही.



टेबलावर गजराचे घड्याळ

या पत्रकार परिषदेला सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे अजितदादांच्या अवतीभवती बसले होते. अजितदादांनी आपल्या करड्या जॅकेटवर घड्याळाचे चिन्ह लावले होते. शिवाय आपल्या समोरच्या टेबलवर गजराचे घड्याळ ठेवले होते. पण सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी तुतारी वाला माणूस हे चिन्ह आपल्या कपड्यांवर धारण केलेले नव्हते. ते चिन्ह फक्त पोस्टरवर दिसत होते.

मोफत प्रवासाची खैरात

अजित पवारांनी पुणेकर आणि पिंपरी चिंचवड करांवर आश्वासनांची खैरात केली. त्यांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची हमी दिली. त्यांच्या हमीला सुप्रिया सुळे यांनी हमी भरली. संपूर्ण पत्रकार परिषदेवर अजितदादांचा एकतर्फी प्रभाव होता. पत्रकार परिषदेचे मुख्य संबोधन अजितदादांनीच केले. त्यांनीच मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची हमी दिली. त्यासाठी येणाऱ्या खर्चाचे विभाजन आणि तरतूद कशा प्रकारे होईल, याचे सविस्तर वर्णन केले. त्यानंतर पत्रकारांनी सगळ्या प्रश्नांची सरबत्ती अजितदादांवरच केली. त्या सरबत्तीलाही अजितदादांनी एकतर्फीच तोंड दिले. पत्रकारांनी एखाद दोन प्रश्न सुप्रिया सुळे यांच्या दिशेने सरकवले. त्यांनी सुद्धा तेवढ्याच प्रश्नांना उत्तरे देऊन तुतारीने घड्याळापुढे शरणागती पत्करल्याचे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले.

पत्रकार परिषदेला हजर असणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या दिशेने एकही प्रश्न विचारला गेला नाही त्यामुळे त्यांनी कुठल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रश्नच उद्भवला नाही.

घड्याळापुढे तुतारीची शरणागती

दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एक होणार, अजित पवारांकडेच पक्षाची सगळी सूत्रे येणार, सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होणार, या वल्गनांच्या पार्श्वभूमीवर आजच्या एकत्रित पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते, पण प्रत्यक्षात तुतारीने घड्याळयापुढे शरणागती पत्करल्याचेच चित्र पत्रकार परिषदेतून समोर आले.

Sharad Pawar’s NCP surrenders infront of Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात