पवारांनी सोडली विलीनीकरणाची पुडी; भाजप नेत्यांनी घेतली उबाठाला ठोकण्याची संधी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी बारामतीतील मतदान संपताच प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमधल्या विलीनीकरणाची पुडी सोडली. त्यामुळे भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ठोकण्याची संधी घेतली.Sharad pawar’s merger comments gave opportunity BJP leaders to target UBT shivsena

शरद पवारांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून आमदार प्रसाद लाड यांच्यापर्यंत सगळ्यांनी टीका टिपणी केली. या सगळ्याचा रोख शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर तर होताच, पण जास्त रोख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर होता.



शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चाहूल लागल्याने त्यांनी त्यांच्या पक्षासकट बाकीच्याही प्रादेशिक पक्षांचे भविष्य ते काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे सांगितले. कारण कुठल्याच प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांचे पक्ष चालवता येण्याची स्थिती नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन्ही पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील याची मला खात्री वाटते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार आणि नंतर जळगावच हाणला. नंदुरबार मध्ये फक्त त्यांनी शरद पवार यांच्याच पक्षाचे विलीनीकरण होईल, असे म्हटले होते. परंतु जळगावत आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना देखील काँग्रेस विलीन होईल, असे शब्द जोडले. भाजपच्या बाकीच्या नेत्यांनी तशाच आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधीने शरद पवारांची मुलाखत ही साताऱ्यात असताना घेतली. त्या मुलाखतीच्या वेळी आपण स्वतः उपस्थित होतो. त्यांनी सगळ्या प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरणाबाबत वक्तव्य केले, पण हे विलीनीकरण 4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागेल, त्या निकालावर अवलंबून असेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पण त्यापूर्वी याच पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन पक्ष लुप्त होतील असे वक्तव्य केले होते. मग हे दोन पक्ष म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हेच होते का??, या प्रश्नावर मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले नव्हते.

शरद पवारांची मुलाखत जरी साताऱ्यात बारामतीच्या मतदानाच्या आधी घेतली होती, तरी प्रत्यक्षात ती बारामतीतले मतदान संपल्यानंतर प्रसिद्धीला आली. त्याचे पडसाद अर्थातच बारामतीतल्या मतदानानंतर उमटले, याला विशेष महत्त्व आहे.

पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामती आणि माढा मतदारसंघांमध्ये मतदान उरकून गेले आहे. मुंबई मात्र मतदानाची शिल्लक आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा “राजकीय प्राण” मुंबईतल्याच पोपटात दडला आहे. अशावेळी पवारांची मुलाखत प्रसिद्ध होण्याच्या टाइमिंगले विशेष महत्त्व आहे. प्रत्यक्षात पवार जे बोलतील ते करतीलच, याची कुठलीही गॅरंटी नाही, पण त्यांनी सोडलेली विलीनीकरणाची पुडी आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ठोकण्याची घेतलेली संधी यातला “राजकीय योगायोग” मात्र न विसरता येण्याजोगा आहे.

Sharad pawar’s merger comments gave opportunity BJP leaders to target UBT shivsena

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात