चोरडियांच्या बंगल्यात अजितदादांची “गुप्त” भेट घेतल्यानंतर पवारांची संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात मोदींवर शरसंधान!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क मधील बंगल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची गुप्त भेट घेतल्यानंतर शरद पवार संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात सामील झाले आणि त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचा वारसा पुढे नेणार असल्याचे सांगितले. Sharad pawar’s double game, meeting with ajit pawar to prevent the split in NCP and then targets Modi in sambhaji brigade conclave

एकीकडे पवारांनी अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात अजित पवार आणि जयंत पाटलांची गुप्त भेट घेतली. भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाणे की “इंडिया” आघाडीत राहणे यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस मधली फूट कायद्याच्या कचाट्यात न अडकवणे यावर या गुप्त भेटीत भर देण्यात आल्याची माहिती आहे.

याचा अर्थ एकीकडे अजित पवार यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवायचे आणि दुसरीकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात उपस्थित राहून आपण फुले शाहू आंबेडकरांचा वारसा पुढे नेला पाहिजे, असे सांगायचे हे दुहेरी राजकारण काल पवार खेळले.

संभाजी ब्रिगेडच्या केडर कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात पवारांनी महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या गोष्टी सांगितल्या. युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. या उत्तरांमधून पुरोगामी महाराष्ट्र धर्माच्या वाटेने जाणार नाही. त्याला जनतेचा पाठिंबा मिळणार नाही, असा दावा केला. त्याच वेळी पवारांनी मोदींवर नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावरून टीकास्त्र सोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनात भारतीय राजदंड सेंगोलची स्थापना केली आहे. त्यावेळी तमिळनाडूतील चोल राजवंशीयांच्या गुरु परंपरेतील साधू पंतप्रधान मोदींनी संसद भवनात गेले होते. मोदींनी त्यांचा आदर सत्कार केला. या मुद्द्यावर पवारांनी मोदींवर शरसंधान साधले. नव्या संसद भवनाच्या बांधकामाची मूळात गरज होती का??, असा सवाल त्यांनी केला.

यातून आपण मोदीविरोधातच राजकारण करणार असल्याचा संदेश पवारांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिला, पण त्यापूर्वी मात्र अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात त्यांनी अजित पवारांशी गुप्त भेट घेऊन राष्ट्रवादीतली फूट कायद्याच्या कचाट्यात अडकू नये निवडणूक आयोगात ते फूट दिसता कामा नये याची पुरेशी “काळजी” घेतल्याचे बोलले जात आहे. पवारांनी काल असे दुहेरी राजकारण साधून घेतले आहे.

Sharad pawar’s double game, meeting with ajit pawar to prevent the split in NCP and then targets Modi in sambhaji brigade conclave

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात