प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2 ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे व्यासपीठावर असणार आहेत. पण त्याच वेळी मोदींच्या निषेधासाठी काँग्रेस आणि शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यातल्या रस्त्यावर उतरणार आहे. पवारांची ही डबल गेम राष्ट्रवादीच्याच अंगलट येणार असल्याचे बोलले जात आहे.Sharad pawar’s double game in lokmanya tilak award program
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झालेला लोकमान्य टिळक पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी लोकमान्यच्या पुण्यतिथी दिनी पुण्यातल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. शरद पवार हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत, तर सुशीलकुमार शिंदे हे टिळक स्मारकाचे विश्वस्त या नात्याने संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करण्यासाठी पुण्यातल्या काँग्रेस भवन मध्ये आज बैठक झाली आणि त्या बैठकीत पुण्यातल्या टिळक चौकात म्हणजेच अलका टॉकीज चौकात मोदींना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा निर्णय झाला. काँग्रेस भवनातल्या बैठकीत शरदनिष्ठ गटाचे नेते देखील उपस्थित होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकीचे विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात रस्त्यावर उतरून त्यांचा निषेध करणार आहेत. यात मणिपूर पासून अर्थव्यवस्थेपर्यंतचे सर्व मुद्दे विरोधी पक्ष मोदींविरोधात जनतेसमोर आणणार आहेत.
पण त्यातूनच एक मोठी राजकीय विसंगती तयार झाली आहे, ती म्हणजे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांचे बडे नेते मात्र मोदीं समावेत व्यासपीठावर दिसणार आहेत.
मोदींबरोबर व्यासपीठावर उपस्थित राहणे आणि आपल्या पक्षाला काँग्रेसच्या निदर्शनांमध्ये सामील व्हायला चिथावणी देणे यामुळे शरद पवारांची “डबल गेम” एक्सपोज झाली आहे. पण या राजकीय विसंगतीतून नुकसान कोणाचे होणार आहे हे सांगायला फार मोठ्या राजकीय ज्योतिषाची गरज नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App