प्रतिनिधी
नाशिक : शेतकरी संकटात आहे, राज्यात अनेक भागात ओल्या दुष्काळाचे संकट आहे. एक महिन्यापासून पालकमंत्री नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार हे बांधावर जाऊन दौरे करत आहेत. मात्र आताचे राज्यकर्ते स्वागत सोहळ्यात मश्गूल असल्याची खरपूस टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी केली.Sharad Pawar’s criticism of Shinde-Fadnavis: Leaving the drought tour, the rulers are busy in the welcome ceremon
नाशिक दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यकर्त्यांनी साधारणत: संकटग्रस्त लोकांच्या वेदना जाणून घेण्यासाठी दौरे करायचे असतात. मुख्यमंत्री महाराष्ट्रात दौरे करतात हे चांगले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही दौरा काढला. मात्र, आताचे राज्यकर्ते हे स्वागत सोहळ्याच्या दौऱ्यासाठी जात आहेत तर विरोधी पक्षनेते पवार हे ज्या परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेथे पाहणी करून दिलासा देत आहेत. आजच्या राज्यकर्त्यांसाठी प्राधान्यक्रम दुसराच आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यासंदर्भात विचारले असता, नव्या सरकारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ते काम समर्थपणे चालवू शकतील असा आत्मविश्वास असल्यामुळे सर्व काही सुरू असल्याचा चिमटा घेतला.
ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय चिंताजनक : ओबीसी
आरक्षणाबाबतचा न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही. मात्र जर ओबीसीसारखा मोठा वर्ग सत्ता व प्रशासनापासून दूर जाण्याची भीती आहे. एकूणच आरक्षणाबाबतची परिस्थिती चिंताजनक आहे. सध्या मालेगाव जिल्हा निर्मितीची चर्चा सुरू असून त्यात दिंडोरीचाही समावेश करण्यात येणार असल्याचे समजते. मात्र या विषयावर नंतर बोलू, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
उत्साही कार्यकर्त्यांचे शहराध्यक्षांनी काढले फोटो
हॉटेल एमराल्ड पार्क येथे पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. अनेकजण पवारांसोबत फोटो घेण्यासाठी धडपडत होते. पवारांनी उत्साहाने कार्यकर्त्यांसोबत फोटोसेशन केले. यावेळी दालनात उभे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे उत्साही कार्यकर्त्यांचे फोटो काढले.
दुसरीकडे, संजय राऊत म्हणतात की, राज्यात पुन्हा सत्तांतर होईल असे विचारले असताना त्यांनी ते त्यांनाच विचारा, मी काय सांगू? मी संजय राऊतांबद्दल कशाला बोलू? असा प्रतिप्रश्न पवार यांनी केला. सरकार कोसळेल की नाही हे सांगण्यास मी ज्योतिषी नाही. मात्र, राज्यात पुन्हा निवडणुका झाल्या तर आम्ही तयार राहू. नाही झाल्या तर राज्य कसं चाललंय यावर बारकाईने लक्ष ठेवू. जिथे कमतरता किंवा चूक दिसेल त्या लक्षात आणून देऊ, असेही शरद पवार यांनी माध्यमांना सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App