प्रतिनिधी
पुणे : संपूर्ण देशात शरद पवारांच्या उंचीचा नेता नाही, असे आपण म्हणतो पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर शरद पवारांना स्वबळावर कधीही मुख्यमंत्री होता आले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असे परखड बोल अजित पवारांसोबत शिंदे मंडळात सामील झालेले पवारांचे विश्वासू नेते दिलीप वळसे पाटील यांनी ऐकवले आहेत.Sharad pawar’s couldn’t muster power with his own capacity in maharashtra, targets dilip walse patil
अजित पवार गटासोबत सत्तेत सहभागी झालेले सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रथमच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांवर बोचऱ्या शब्दांत टीका केल्याने राष्ट्रवादीत सध्या सुरू असलेल्या काका पुतण्यांच्या नुरा कुस्तीत वेगळीच हलगी वाजली आहे.
शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असे आपण म्हणतो. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना एकदाही बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही, असे शरसंधान दिलीप वळसे-पाटील यांनी साधले.
अजित पवार गटासोबत गेल्यानंतरही दिलीप वळसे-पाटलांनी आतापर्यंत तरी शरद पवारांवर टीका केली नव्हती. शरद पवार हेच आमचे नेते आणि गुरू असल्याचे ते सांगत होते. मात्र, अचानक दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांवर एवढ्या प्रखर शब्दांत टीका केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, आतापर्यंत शरद पवारांविषयी अत्यंत आदाराने बोलणारे दिलीप वळसे-पाटील का बोलले? याचीही चर्चा आता रंगू लागली आहे.
रविवारी पुण्यातील मंचर येथील जाहीर कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील म्हणाले, शरद पवार यांना एकदाही स्वबळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही. देशातील अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पाहिले तर ते पुढे जात आहेत. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. आपल्याकडे शरद पवारांसारखे नेते आहेत. मात्र, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपले (राष्ट्रवादीचे) फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते.
ईडीची नोटीस सापडली तर राजीनामा देईल
ईडीच्या भीतीपोटीच राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत गेले, या टीकेलाही दिलीप वळसे-पाटलांनी प्रत्युत्तर दिले. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, कोणाला माझ्याविरोधात ईडीची नोटीस सापडली तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल. राज्य सरकारमध्ये मी, अजित पवार व काही सहकारी सहभागी झालो. याचा अर्थ भारतीय जनता पक्षात गेलो असे अजिबात नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरच आहोत. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले असा अपप्रचार केला जात आहे. ते चुकीचे आहे. तशी नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या. आमदारकीचा लगेच राजीनामा देईल.
*सत्तेसाठी निष्ठा विकून खाल्ली : आव्हाड
दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी वळसे-पाटील यांच्यावर सडकून टीका केली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, दिलीप वळसे-पाटील यांचा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही, याचे आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. दिलीप वळसे-पाटील बाजूच्या मतदार संघात आमदारही नाही निवडून आणू शकले. वळसे पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही…पण आदरणीय साहेबांसाठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले. बरे झाले साहेबांविषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही. क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App