शरद पवार विरुद्ध अजित पवार; प्रतिभाताई (अन्)कॉमन फॅक्टर!!; प्रतिभाताईंची “एन्ट्री” आता अजितदादांचे मन वळवेल??

शरद पवार विरुद्ध अजित पवार प्रतिभाताई (अन्)कॉमन फॅक्टर हे शीर्षक वाचून कदाचित काही वेगळे वाटेल. पण जेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांच्यातला संघर्ष बिंदू तप्त होतो, तेव्हा प्रतिभाताई नावाच्या “कॅटलिस्ट” त्यामध्ये सहभागी होऊन आत्तापर्यंत तरी हा संघर्ष थांबवत आल्याचा अनुभव आहे.Sharad pawar vs Ajit pawar pratibhatai common factor

2019 मधला पहाटेचा शपथविधी असो की शरद पवारांच्या विस्तारित आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभ असो, की आज पुणे – मुंबई प्रवासादरम्यान शरद पवारांसमवेत प्रतिभाताईंचे पुष्पवृष्टीने झालेले स्वागत असो, यात प्रतिभाताई हा “कॉमन फॅक्टर” आहे पवारांनी हा “फॅक्टर” अतिशय चलाखीने समोर आणला आहे.



पवारांनीच 2019 च्या शपथविधीच्या विषयी काही आठवणी सांगताना अजित पवारांनी प्रतिभाताईंसमोर येऊन माफी मागितली आणि आम्ही 2019 च्या पहाटेच्या शपथविधीचा विषय संपविला होता, असे सांगितले होते. प्रतिभाताई आणि अजितदादा यांच्या भावनिक नात्याचा उल्लेख देखील पवारांनी त्यावेळी आवर्जून केला होता.

शरद पवारांनी विस्तारित आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात जे निवृत्ती नाट्य घडविले होते, त्यावेळी देखील प्रतिभाताई स्टेजवर पवारांच्या शेजारी मध्यभागी बसल्या होत्या. एरवी प्रतिभाताई शरद पवारांबरोबर अनेकदा सार्वजनिक व्यासपीठावर दिसल्या असल्या, तरी त्या राजकारणात फोर फ्रंटवर कधीच दिसल्या नव्हत्या. पण पवारांच्या निवृत्ती नाट्यदरम्यान त्या दिवशी अडीच ते तीन तास त्या पवारांच्या शेजारी बसून होत्या आणि त्यामुळे त्या सर्व एपिसोडला एक विशिष्ट भावनिक टचही मिळाला होता.

त्यावेळी पवारांनी आपली निवृत्ती मागे घ्यावी, असा आग्रह अजित पवार सोडून सगळ्यांनी धरला होता. उलट अजित पवारांनी बाकी सर्वांना, पवार साहेब त्यांच्या हयातीत एखाद्या नेत्याला पुढे आणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सोपवत असतील आणि त्याचे नेतृत्व गुण विकसित करत असतील, तर तुमची काय हरकत आहे??, अशा शब्दांत दटावले होते. त्यावेळी देखील प्रतिभाताई शरद पवारांच्या शेजारीच बसून होत्या.

राष्ट्रवादीच्या उभ्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आज जेव्हा शरद पवारांनी प्रतिभाताईंसमवेत पुण्याहून मुंबईपर्यंत प्रवास केला, तेव्हा त्या रस्त्यावर वेगवेगळ्या शहरांमध्ये नाक्या नाक्यांवर पवार समर्थकांनी “राज ठाकरे स्टाईल” पुष्पवृष्टीने त्यांचे स्वागत केले. त्या स्वागतामुळे प्रतिभाताई भारावून गेल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. त्यांचे फोटो अपलोड केले. व्हिडिओ शूटिंग दाखवले.

या सगळ्याचे पवारनिष्ठ टाइमिंग मराठी माध्यमांनी साधले आहे. राष्ट्रवादीच्या फुटी दरम्यान शरद पवारांनी प्रतिभाताईंना मूकपणे फोर फ्रंट वर आणले आहे. 2019 च्या शपथविधीच्या वेळी अजित पवार प्रतिभाताईंसमोर आले आणि त्यांनी माफी मागून तो विषय संपविला, असे शरद पवारच म्हणाले होते.

मग आता जेव्हा प्रतिभाताई पुणे ते मुंबई प्रवासात पवारांबरोबर आल्या आणि पवारांच्या स्वागतामुळे त्या भारावून गेल्या. भावूक झाल्या, त्यावेळी अजित पवार काय करणार आहेत??, हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. पवारांचे प्रतिभाताईंसह झालेले हे “राज ठाकरे स्टाईल” स्वागत नाट्य अजित पवारांच्या निर्णयावर कोणता परिणाम करेल का??, हे ठळक प्रश्नचिन्ह आहे. म्हणूनच शरद पवार विरुद्ध अजित पवार प्रतिभाताई (अन्)कॉमन फॅक्टर!!…, हे शीर्षक दिले आहे.

Sharad pawar vs Ajit pawar pratibhatai common factor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub