महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार ना कुठल्या वाटाघाटींमध्ये भाग घेत आहेत, ना त्यांनी कुठल्या सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पण उद्या बारामतीत होणाऱ्या गौतम अदानींच्या कार्यक्रमाला मात्र पवार हजर राहणार आहेत. पवारांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये एकूण हालचालींवरूनच आता उरले अदानींपुरते असे म्हणायची वेळ आली आहे.Sharad Pawar to attend Gautam Adani program in Baramati
महाराष्ट्रात नुकत्याच नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या प्रचारात शरद पवारांनी कुठेही भाग घेतल्याचे दिसले नाही. त्याचबरोबर त्यांनी कुठे उमेदवार ठरविले नाहीत. कुठे नगराध्यक्ष पदाचे प्यादे फिरवले नाही. त्यांनी स्थानिक पातळीवरच्या राजकारणात भाग घेतल्याचे दिसले नाही. पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत फार मोठे अपयश आले, तरीदेखील त्यावर त्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अर्थात पवारांचे सध्याचे 85 वय बघता त्यांनी स्थानिक निवडणुकांच्या अतिस्थानिक राजकारणात लक्ष घालणे अपेक्षित सुद्धा नव्हते. पण त्यांच्या ऐवजी त्यांच्या पक्षाची धुरा सुप्रिया सुळे यांनी वाहणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपल्यावरची ती जबाबदारी झटकली होती. नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत बिलकुलच “ऍक्टिव्ह” नव्हत्या.
– पुण्यात सुप्रिया सुळे अपयशी
महापालिकांच्या निवडणुका आल्याबरोबर सुप्रिया सुळे ॲक्टिव्ह झाल्या, पण त्या सुद्धा फार मर्यादेत. शिवाय त्यांनी पुण्यात टाकलेला डाव सुद्धा प्रशांत जगताप यांनी उधळून लावला सुप्रिया सुळेंना पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी छुपी युती करायची होती ती कार्यकर्त्यांनी युती केली आहे त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही, असे भासवायचे होते. परंतु, प्रशांत जगताप यांनी ऐन वेळेला सुप्रिया सुळे यांच्या डावात खोडा घातला. अजित पवारांबरोबर छुपी आणि उघड कुठलीच युती नको. त्यापेक्षा मी पक्ष सोडतो असे म्हणून ते काँग्रेसमध्ये निघून गेले. पण हे करताना त्यांनी एवढा मोठा गाजावाजा केला, की सुप्रिया सुळे यांचा सगळा डाव उधळून गेला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर पुण्यात सूत जुळले नाहीच, पण प्रशांत जगताप यांच्यासारखा कार्यकर्ता सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीला गमवावा लागला.
एवढे सगळे होऊन सुद्धा पवारांनी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रशांत जगताप यांनी त्यांची सुरुवातीला भेट घेऊन आपली भूमिका व्यवस्थित विशद केली होती, पण पवारांनी त्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांना “बाय” दिला होता. त्यांनी पुणे किंवा पिंपरी चिंचवडच्या स्थानिक राजकारणात लक्ष घालून स्वतःहून उमेदवार शोधले किंवा बसविले नाहीत.
– गौतम अदानींचा बारामती उद्या कार्यक्रम
पण उद्या 28 डिसेंबर रोजी मात्र शरद पवार हे गौतम अदानींच्या कार्यक्रमाला बारामतीत आवर्जून उपस्थित राहणार आहेत. तिथे त्यांच्याबरोबर अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार हे सुद्धा हजर राहणार आहेत. कारण गौतम अदानी यांनी दिलेल्या 25 कोटी रुपयांच्या देणगीतून शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स उभे राहिले आहे. त्याच्या उद्घाटनाला गौतम अदानींना बोलविल्याने पवार तिथे हजेरी लावणार आहेत. याचा अर्थ बाकीच्या कुठल्याही निवडणुकीच्या सार्वजनिक कार्यक्रमाला गैरहजर राहणारे पवार अदानींपुरते उरले आहेत, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App