मी कुणाला शत्रू मानत नाही; नाशिक मध्ये सूचक वक्तव्य करून शरद पवारांनी बंडखोरांना चुचकारले


प्रतिनिधी

नाशिक : शरदनिष्ठ आणि अजित निष्ठा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घमासन सुरू असताना मी कुणाला शत्रू मानत नाही, असे सूचक वक्तव्य शरद पवारांनी नाशिक मधल्या पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. वैचारिक मतभेद असतील पण शत्रुत्व पण नाही, असे शरद पवार म्हणाले.Sharad Pawar taunted the rebels by making a suggestive statement in Nashik

येवल्यातल्या सभेपूर्वी नाशिकमध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले, त्यावेळी आगामी काळात तुमचा प्रतिस्पर्धी कोण? आत्ता पक्ष सोडून गेलेले लोक, की भाजपा? असा प्रश्न शरद पवार यांना विचारला. त्यावेळी शरद पवार म्हणाले, “मी राजकारणात कुणालाही शत्रू मानत नाही. राजकारणात मतभेद असतात, मतभिन्नता असते. पण त्याचा अर्थ शत्रुत्व असतं असा नाही.”शरद पवारांनी हे वक्तव्य केल्यामुळे बंडखोरांमधल्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना पवारांनी चुचकारल्याचे मानले जात आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेतील ते त्यांच्यावर आहे पण कुणी एकत्र असेल तर आनंद आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. एवढंच नाही तर राजकारणाचा चिखल झाला असला तरीही त्यात बियाणं टाकायचं असतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आव्हाड, जयंत पाटलांचा अभिमान

आव्हाड आणि जयंत पाटील पक्षाचे अडसर आहेत का? असा प्रश्न विचारला असता, “पक्षाच्या बऱ्या वाईट काळात भक्कपणे, स्वतःच्या करिअरचा विचार न करता, पक्षाच्या विचारधारेसाठी पडेल ते करणारे हे लोक आहेत. त्यामुळे त्यांचा आम्हाला अभिमान आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नाशिकपासूनच सुरुवात का केली?

मी नाशिक निवडलं? कारण स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिकचं वेगळं महत्व आहे. तसंच काँग्रेसच्या इतिहासातही नाशिकचं वेगळं महत्त्व आहे. अनेक उत्तम मार्गदर्शक या शहराने दिले आहेत. तसंच आणखी एक गोष्ट अशी आहे की आम्ही सगळे जण जी पिढी राजकारणात पडली त्यांचा आदर्श यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळी चीनचं संकट देशावर आलं आणि त्यांना नेहरुंनी दिल्लीत बोलवलं. त्यांना संरक्षण मंत्री केलं. चव्हाण यांचा पहिला लोकसभेतला प्रवेश नाशिकमधून झाला. ही नाशिकची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी इथून सुरुवात केली आहे असंही शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar taunted the rebels by making a suggestive statement in Nashik

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात