प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटकात काँग्रेसचा अभूतपूर्व विजय झाल्यानंतर महाराष्ट्रात उत्साहात आलेल्या शरद पवारांनी महाविकास आघाडीची आपल्या निवासस्थानी सिल्वर ओक वर बैठक बोलावली. मात्र, पवारांनी स्वतः पुढाकार घेऊन बोलावलेल्या बैठकीआधी काँग्रेसने टिळक भवनावर बैठक घेतली आणि त्यामध्ये आपली रणनीती ठरवली. Sharad Pawar summoned MVA meeting but Congress meet before that and tried to overpower MVA
महाविकास आघाडीत काँग्रेस सुरुवातीला तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. पण आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. कर्नाटकच्या विजयानंतर महाराष्ट्रातल्या काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला असून त्या दृष्टीनेच पवारांनी घेतलेल्या पुढाकार घेऊन घेतलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसने टिळक भवनात स्वतःची बैठक घेतली आणि महाविकास आघाडीत आपला सत्तेचा आणि जागांचा वाटा कसा वाढेल याविषयी चर्चा केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कर्नाटक निकालाच्या आधीच राहुल गांधींना दिल्लीत भेटून आले होते आणि त्यांच्याकडून पाठिंबा मिळवून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संघटनात्मक फेरबदलाच्या दृष्टीने यांनी पावले उचलली आहेत. जून महिन्यापर्यंत हे फेरबदल पूर्ण करून काँग्रेसला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविण्याचा पण नाना पटोले यांनी केला आहे.
पण दरम्यानच्या काळात कर्नाटकच्या काँग्रेसच्या विजयामुळे उत्साहात आलेल्या पवारांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीची बैठक घेऊन आपला वरचष्मा कायम राखण्याचा प्रयत्न केला. त्याला फक्त उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. कारण काँग्रेसचे सगळेच वरिष्ठ नेते टिळक भवन आतल्या बैठकीत हजर राहिले. सिल्वर ओक कडे कोणी फिरकलेले दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App