सोफ्यावर अदानी, खुर्चीवर फडणवीस; नुसते फोटो शेअर करून काय होणार??, असा असावा विचारण्याची वेळ शरद पवारांनी शेअर केलेल्या फोटो मुळे आली, पण त्या पलीकडे जाऊन पवारांना असले फोटो शेअर करावेसे वाटतात किंबहुना शेअर करावे लागतात, यातूनच सगळे राजकीय रहस्य बाहेर आले!!, असे म्हणायची वेळ ही आली.Sharad Pawar shares photo with Gautam Adani and Devendra fadnavis
कारण शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या बरोबरचा एक फोटो आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केला. IPS अधिकारी प्रवीण रामराव पवार यांच्या मुलीच्या लग्नातला तो फोटो होता. पण हा फोटो स्वतः देवेंद्र फडणवीस किंवा गौतम अदानी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केला नाही. तो फक्त शरद पवारांनी शेअर केलेला दिसला.
पवार – फडणवीस जवळीक
शरद पवारांनी हा फोटो शेअर केल्याबरोबर “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांना आनंदाचे भरते आले. शरद पवारांची गौतम अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कशी आणि किती जवळीक आहे, याची भरभरून वर्णने मराठी माध्यमांनी केली. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी एवढ्यातल्या एवढ्यात किमान दोनदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यासाठी निमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे होते. परंतु, पार्थचा जमीन घोटाळा आणि त्या पाठोपाठ अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी ही जास्त मोठी राजकीय पार्श्वभूमी पवार – फडणवीस भेटी मागे होती. या भेटी संदर्भात दोघांनीही अधिकृतरित्या कुठलीही माहिती सांगितली नाही. पण त्यावरून “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी अजित पवारांच्या राजीनाम्याचे मोठे मोठे इमले परस्पर बांधले. शरद पवार आपला प्रभाव वापरून अजित पवारांचा राजीनामा घेणार, ते अजित पवारांचा राजीनामा रोखणार, अशा बातम्या मराठी माध्यमांनी पेरल्या. यातून शरद पवारांचे “राजकीय मोठेपण” अधोरेखित करायचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न नेहमीसारखाच होता. कारण पवारांनी सोलापूर जिल्ह्यात कुठलेही बदल केला, की “पवारांनी डाव टाकला”, “”पवारांनी खेळी केली” असली वर्णने करायची मराठी माध्यमांची पद्धत आहे. तीच पद्धत मराठी पवारांनी शेअर केलेल्या फोटो वरून वापरली.
आयपीएस अधिकारी श्री. प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व हिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलो; नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार श्री. शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. pic.twitter.com/RI6ZqUACNg — Sharad Pawar (@PawarSpeaks) November 12, 2025
आयपीएस अधिकारी श्री. प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व हिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलो; नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार श्री. शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. pic.twitter.com/RI6ZqUACNg
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 12, 2025
– मराठी माध्यमांच्या “पवार बुद्धीच्या” पलीकडचे सत्य
पण त्या फोटोचे त्या पलीकडेच सत्य मराठी माध्यमांनी सांगितले नाही. मूळात शरद पवारांना एका IPS अधिकाऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नाला बोलावले. ते तिथे गेले. त्यांनी गौतम अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरचा फोटो शेअर केला. पण हाच फोटो शेअर करण्याइतपत फडणवीस आणि अदानी यांना महत्त्वाचा वाटला नाही, यातच सगळे आले. पवारांना आता देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बरेच जुळवून घ्यायला लागते आहे, याचाच तो फोटो निदर्शक आहे. कारण पवारांना खेळातल्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात आपले अस्तित्व टिकवून ठेवायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भेटीगाठी कराव्या लागतात किंवा वाटाघाटी कराव्या लागतात, हेच राजकीय सत्य हा फोटो सांगून गेला.
पवारांची जवळीक कायम केंद्रीय नेतृत्वाशी, पण…
एरवी सत्तेसंदर्भात कुठल्याही वाटाघाटी करताना शरद पवारांनी कायम काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी जवळीक दाखविली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याशी आपली जवळीक आहे, असे त्यांना दाखवावे लागले नव्हते. अनेकदा शरद पवार आपली पंतप्रधान मोदींची थेट जवळीक आहे असे दाखवून देण्यासाठी सुद्धा मोदींच्या भेटीगाठी घेतात. त्या भेटी 2 – 5 मिनिटांच्याच असतात, पण स्वतः पवारच त्या भेटीची फार मोठी “हवा” करतात. मराठी माध्यमांमध्ये फोटो छापून आणतात. पण आज त्याच पवारांना देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर आपले फोटो शेअर करावेसे वाटतात. किंबहुना करावे लागतात, हे “राजकीय सत्य” मराठी माध्यमांनी सांगितले नाही. कारण हे सत्य पचवायला मराठी माध्यमांना जड गेले, पण म्हणून सत्य लपून राहिले नाही.
– काँग्रेसला डिवचले
त्याचबरोबर गौतम अदानी यांच्याबरोबर आपली अजूनही जवळीक आहे हे शरद पवारांना दाखवून द्यावे लागले. पण त्यामुळे पवारांनी भाजप किंवा अजित पवार यांना डिवचले नाही, तर त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला डिवचले. त्यातून भाजप किंवा अजित पवार यांना फरक पडला नाही, फरक पडलाच तर तो राहुल गांधी आणि काँग्रेसला पडेल, हे सत्य सुद्धा “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी सांगितले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App