नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील जिरायती भागाचा दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात पवारांनी उंडवडी पठार या गावातून केली. यावेळी बोलताना शरद पवारांनी आपल्या राजकीय जीवनातले अनुभव सांगितले. आपण आयुष्यामध्ये अनेक राजकीय पदे भोगली, पण आपल्याला सर्वांत जास्त आनंद केव्हा झाला असेल, तर देशाचे कृषिमंत्री पद भूषविल्यानंतर!!, असे शरद पवार म्हणाले. Sharad pawar said, he demanded agriculture ministry to Manmohan Singh, but he had no capacity demand heavyweight ministry
माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच मूळात जिरायती भागापासून झाली. त्यावेळी ग्रामीण भागातील जिरायत भाग आणि दुष्काळ यांचे कायमचे नाते होते. त्यामुळे गावागावांमध्ये रोजगार हमीची कामे, दुष्काळी कामे, बंधारे यांची कामे केली, असे सांगून पवार म्हणाले, मी राजकीय आयुष्यात अनेक मंत्रिपदे भूषविली. पण मला सर्वांत जास्त आनंद देशाचे कृषिमंत्री पद भूषवताना झाला. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मला जेव्हा कुठले मंत्रीपद हवे??, अशी विचारणा केली, त्यावेळी मी ताबडतोब इतर कोणतेही मंत्री पद न मागता कृषी मंत्रिपद मागितले. देशाचा कृषिमंत्री झाल्यावर शेती क्षेत्रात मी अनेक बदल केले. धान्य आयात करणारा देश धान्य निर्यात करणारा देश बनविला. 72000 कोटींची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, पण आजचे भाजप सरकार मग्रूर आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताशी काहीही देणे घेणे नाही, असे टीकास्त्र पवारांनी सोडले.
शरद पवारांच्या वक्तव्यातला जिरायत भागातील अनुभव आणि विविध मंत्रिपदे भूषवणे हा भाग सोडला, तर त्यांनी मनमोहन सिंगांकडे कृषिमंत्री पद मागितले आणि ते मनमोहन सिंग यांनी त्यांना दिले, या वक्तव्यात किती तथ्यांश आहे, हे तत्कालीन राजकीय परिस्थिती तपासली असता, काही वेगळेच सत्य समोर आले.
NCP-SCP chief Sharad Pawar addresses public rally in Maharashtra Baramati "When I was the Union agriculture minister, I helped the then Gujarat CM Narendra Modi without any partiality, but today the same person is making personal comments against me. Today, if someone comments… pic.twitter.com/88QaAguERO — ANI (@ANI) April 8, 2024
NCP-SCP chief Sharad Pawar addresses public rally in Maharashtra Baramati
"When I was the Union agriculture minister, I helped the then Gujarat CM Narendra Modi without any partiality, but today the same person is making personal comments against me. Today, if someone comments… pic.twitter.com/88QaAguERO
— ANI (@ANI) April 8, 2024
नरसिंह राव सरकारमध्ये संरक्षण मंत्री
मनमोहन सिंग यांनी शरद पवारांना 2004 मध्ये देशाचे कृषिमंत्री केले. केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी खात्याचे मंत्रिपद हे नवव्या क्रमांकाचे पद आहे. पवार त्याआधी पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रात संरक्षण मंत्री होते. हे देशाचे दुसऱ्या – तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद आहे. पण पवारांचे संरक्षण मंत्रिपद अवघे दोनच वर्षे टिकू शकले. त्यानंतर पवारांना नरसिंह राव यांनी संरक्षण मंत्री पदावरून दूर करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाठवून दिले होते.
हेवीवेट मंत्रिपदाची पवारांची ताकद नव्हती
पण 2004 मध्ये शरद पवारांनी संरक्षण मंत्री पद अथवा गृहमंत्री पद मागावे आणि ते काँग्रेसच्या पंतप्रधानांनी त्यांना द्यावे, अशी बिलकुलच राजकीय परिस्थिती उरलेली नव्हती. पवार 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते काँग्रेस पासून फुटून 5 वर्षे झाली होती. त्यामुळे काँग्रेसच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देताना हे दुसऱ्या – तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळणे शक्यच नव्हते. किंबहुना तशी घोषणाच त्यावरचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी केली होती. काँग्रेस बरोबरच्या आघाडीत घटक पक्षांना मिळणारी मंत्रिपदे ही पहिल्या चार ते पाच क्रमांकावरची नसतील, तर त्या पुढच्या क्रमांकाची असतील, असे प्रणव मुखर्जींनी त्यावेळीच स्पष्ट केले होते. त्यामुळे पवारांनी पहिल्या दोन-तीन क्रमांकाची खाती म्हणजे गृह, अर्थ अथवा संरक्षण किंवा अगदी मनुष्यबळ अथवा वाणिज्य मंत्रालय मागितले असते, तरी ते काँग्रेसच्या पंतप्रधानांनी त्यांना दिलेच नसते. कारण ती मंत्रीपदे मागण्याची पवारांची तेवढी राजकीय ताकदच उरलेली नव्हती.
नवव्या क्रमांकावर “समाधान”
2004 मध्ये आणि 2009 मध्ये काँग्रेसला आघाडीची गरज होती हे खरे, पण त्याहीपेक्षा आघाडीची गरज पवारांसारख्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना जास्त होती. कारण त्यांना सत्ता पदे हवी होती. त्यामुळे पवारांना प्रत्यक्षात कोणतेही वरिष्ठ मंत्रीपद न मागता कृषिमंत्री पद या नव्या क्रमांकाच्या पदावर समाधान मानणे भाग पडले होते. त्यामुळे पवारांनी आपण मनमोहन सिंगांकडे कृषिमंत्री पद मागितले आणि ते त्यांनी दिले, अशी कितीही मखलाशी केली असली, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती, उलट त्यांना नवव्या क्रमांकाचे मंत्रीपद घेऊन समाधान मानावे लागले होते, ही वस्तुस्थिती होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App