Sharad Pawar : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल माहिती नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय, राष्ट्रवादीने काय करावे हा त्यांचा निर्णय- शरद पवार

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे :Sharad Pawar  सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जो निर्णय घेण्यात आला तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे. त्यावर मी काही भाष्य करणार नाही, असे खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे.Sharad Pawar

शरद पवार म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल इतकी घाई मी केलेली नाही. सुनेत्रा पवारांशी माझी काहीही चर्चा झालेली नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये विलीनीकरणाबद्दल चर्चा झाली होती. याबद्दल संपूर्ण जबाबदारी अजित पवारांकडे होती. पण या सर्व गोष्टीमध्ये आता खंड पडला आहे. अजित पवार यांच्या एकत्रीकरणाची इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे.Sharad Pawar



अजित पवारांची इच्छा पूर्ण व्हावी

शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या एकत्रीकरणाची इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे. गेल्या 4 महिन्यापासून ही चर्चा सुरू होती, आता कोण चर्चा करणार हे ठरेल. दोन्ही पक्षामध्ये संवाद रहावा यासाठी आम्ही सकारात्मक होतो. विलीनीकरणाबद्दल निर्णय 12 तारखेला जाहीर करणार होते, त्या चर्चेत मी नव्हतो पण जयंत पाटील आणि अजित पवारांचे बोलणं झाले होते.

अजित पवारांच्या जाण्याने मोठा धक्का

शरद पवार म्हणाले की, पवार कुटुंबातील सर्वांना अजित पवारांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. राज्याच्या दृष्टीने जे जे करणे गरजेचे आहे ते सर्व काही आम्ही करु. आमच्या नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचे काम करू. सुनेत्रा पवारांचा शपथविधी आहे का नाही याबद्दलच मला माहिती नाही. त्यामुळे मी उपस्थित राहणार का नाही हा प्रश्नच येत नाही. नरेश अरोरा कोण आहेत मला माहिती नाही.

जयंत पाटील चर्चा करतील

शरद पवार म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र येतील का नाही याबद्दल आताच काही सांगता येत नाही. पण अजित पवारांची दोन्ही पक्ष एकत्र यावे ही इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे. अपघात हा अपघात त्यावर काय बोलणार. दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत अजित पवार – जयंत पाटील हे चर्चा करत होते आता जयंत पाटील आणि ही मंडळी पुढे काय करायचे हे ठरवतील. आम्ही भाजपसोबत जाण्याचा काय संबंध आहे. आमची चर्चा ही पक्षासंदर्भात सुरू होती.

Sharad Pawar on Sunetra Pawar’s Swearing-in: ‘It’s Their Internal Decision’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात