Sharad Pawar Reaction : भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक व्हायला आमदार आणि खासदारांना बंदी घातली आहे. शुक्रवारी आरबीआयने यासंबंधी अधिसूचना काढली. यामुळे राजकारणी, नेतेमंडळीच्या वरदहस्ताने नातेवाइकांना कर्ज वाटप करून गुंतवणूकदार, ठेवीदारांच्या रकमेवर डल्ला मारण्याच्या सहकारी बँकांतील प्रकारांना आता पायबंद बसणार आहे. दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Sharad Pawar Reaction On RBI Bans Politicans, Leaders as Co oprative Bank Director
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक व्हायला आमदार आणि खासदारांना बंदी घातली आहे. शुक्रवारी आरबीआयने यासंबंधी अधिसूचना काढली. यामुळे राजकारणी, नेतेमंडळीच्या वरदहस्ताने नातेवाइकांना कर्ज वाटप करून गुंतवणूकदार, ठेवीदारांच्या रकमेवर डल्ला मारण्याच्या सहकारी बँकांतील प्रकारांना आता पायबंद बसणार आहे. दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले की, ‘आरबीआय ही आर्थिक संस्था, बँकिंग संस्था यांच्यावर लक्ष ठेणारी सर्वोच्च संस्था आहे. त्यामुळे त्यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले असतील तर त्याची माहिती घ्यावी लागले. निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावा लागेल.’
पवार पुढे म्हणाले की, “सरकार चालवताना कधीतरी काही प्रश्न निर्माण होतात. असे प्रश्न येतात तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी एखादी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली आणि त्यानुसार तिन्ही पक्षांच्या वतीने काही सहकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली. यामध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई व राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील त्यामध्ये आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे आमचे सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यासंबंधी निर्णय घेतात. त्यामुळे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. आणि याच पद्धतीने जाण्याची भूमिका सर्वांची असल्याने सरकार पाच वर्ष टिकेल, यात शंका नाही.”
Sharad Pawar Reaction On RBI Bans Politicians, Leaders as Co oprative Bank Director
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App