विशेष प्रतिनिधी
मुंबई : खुंटा केला हलवून बळकट, डोळ्यातून काढले पाणी!!, या शरद पवार कृत राजकीय नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडेंना चक्क सावरकरांच्या काव्यपंक्ती आठवल्या. पवारांनी आपला निवृत्त होण्याचा निर्णय फिरवावा यासाठी अंकुश काकडे यांनी सावरकरांच्या “जयोस्तुते” या सुप्रसिद्ध काव्याच्या ओळी आळवल्या. पवारांना उद्देशून ते म्हणाले, तुझे साठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण!!” यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरचे सगळे सभागृह भावूक झाले.Sharad Pawar quit as NCP president, but ankush kakde tried to convince him by reciting savarkar poem
सध्या तसाही सावरकर हा महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण देशातल्या राजकारणातला हॉट टॉपिक आहे. त्यातही राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्यानंतर स्वतः शरद पवारांनी सावरकरांच्या सामाजिक कार्याची महती सांगत राहुल गांधींना बॅकफूटवर ढकलले होते.
एरवी महाराष्ट्रात राजकारण करताना शरद पवार हे फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा घोष करत असतात. पण त्यांचा निवृत्त होण्याचा निर्णय फिरवण्यासाठी मात्र अंकुश काकडे यांना सावरकरांच्या “जयोस्तुते” या अजरामर काव्यातील ओळींचा आधार घ्यावा लागला.
सावरकरांनी “जयोस्तुते” हे गीत आणि त्या काव्यपंक्ती भारत मातेला आळविण्यासाठी लिहिल्या आहेत. अंकुश काकडे यांनी मात्र त्या पवारांसाठी वापरल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियात परस्पर विरोधी प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App