खुंटा केला हलवून बळकट डोळ्यातून काढले पाणी; पण खरी तर बातमी लपली अजितदादांच्या दरडावणीत!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : खुंटा केला हलवून बळकट, डोळ्यातून काढले पाणी!!… पण खरी बातमी, तर लपली अजितदादांच्या दरडावणीत…!!, हेच आजच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या राजकीय नाट्याचे इंगित आहे. कारण शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये, मुंबईत आणि बाकीच्या महाराष्ट्रात जो भावनेचा खेळ झाला, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना हुंदके आले, या मागचे सगळे “राजकीय रहस्य” अजित पवारांनी एका दरडावणीतून उघड करून टाकले. Sharad Pawar quit as NCP president, ajit Pawar revealed its political truth in the party

शरद पवार यांनी आज 2 मे 2023 रोजी जरी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली असली तरी ती “अचानक” वगैरे नव्हती, तर ती कालच करायचे ठरले होते. म्हणजे 1 मे रोजीच करायचे ठरले होते. पण काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होती आणि महाराष्ट्र दिन होता. मीडियामध्ये त्या बातम्या चालण्याऐवजी शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातम्या चालल्या असत्या, म्हणून त्यांनी आज 2 मे 2023 ही तारीख निवडून निवृत्तीची घोषणा केली, असे अजितदादांनी उघडपणे जाहीर केले आणि काय रडारड चाललीय, हे कधी ना कधीतरी होणारच होते ना…!! अशा शब्दांत अजित दादांनी यशवंतराव चव्हाण मधल्या सेंटर मधल्या कार्यकर्त्यांना दरडावले.

अजित पवार म्हणाले :

तुम्ही गैरसमज करून घेत आहात की शरद पवारांनी पद सोडले म्हणजे ते बाजूला जातील. पण तसे होणार नाही. नवीन नेतृत्वाकडे संधी दिली जाणार आहे. उद्या येणारा नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. कोणी येरा गबाळा अध्यक्षांची निवड करणार नाही.

शरद पवार यांनी म्हटले आहे की, भाकरी फिरवायची वेळ आली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणे, लोकांना भेटणे सुरू राहिले. कुणी पण अध्यक्ष झाले, प्रांताध्यक्ष झाले तरी शरद पवार यांच्याच जीवावर पक्ष चालणार आहेत. शरद पवार हे सर्व प्रमुखांना एकत्र बसवून निर्णय घेत असतात आणि अचनक हा निर्णय घेतला यांची कुणाला माहिती नव्हती. भाकरी फिरवायची म्हणाले मात्र स्वतःपासून फिरवली. उद्या नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला अडचण काय आहे?

शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत. खासदारकी आमदारकीबाबत सर्व निर्णय त्यांच्याबाबत तेच घेतील. हा निर्णय कालच होणार होता मात्र 1 मे असल्यामुळे झाला नाही. हे कधी ना कधीतरी होणारच होते ना मग काय रडारड झाली आहे??

Sharad Pawar quit as NCP president, ajit Pawar revealed its political truth in the party

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात