Sharad Pawar : पवारांच्या राष्ट्रवादीतून सुटली “नवी राजकीय पुडी”; भाजपचे मित्र पक्ष फोडून शिंदे आणि अजितदादांच्या हातात घालू पाहताहेत नव्या युतीची बेडी!!

Sharad Pawar

नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सुटली “नवी राजकीय पुडी”; भाजपचे मित्र पक्ष फोडायला शिंदे आणि अजितदादांच्या हातात घालणार युतीची नवी बेडी!!, असला प्रकार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आता समोर आलाय. Sharad Pawar

आपल्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची सत्तेच्या अभावी होणारी तडफड बघून शरद पवारांनी आधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची पुडी सोडून पाहिली. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी त्यातली खरी “राजकीय मेख” बरोबर ओळखली. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये विलीन झाली, तर शरद पवारांच्या मुलीचे आणि पुतण्याचे राजकीय भवितव्य भाजप settle करेल, पण मधल्या मध्ये आपले राजकीय पत्ते कट होतील याची भीती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वाटली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चाच विझवून टाकली.

पण त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसून अजित पवारांच्या सत्तेतला तुकडा तोडता आला नाही. पण म्हणून गप्प बसून राहतील तर ते “शरद पवार” कसले??



 पवारांचा नवा डाव

पवारांनी नवा डाव टाकत आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी राजकीय पुडी सोडली. भाजपच्या मित्र पक्षांना भाजपपासून तोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याशी आपल्या राष्ट्रवादीची युती करण्याची तयारी चालविली. स्थानिक पातळीवरील निवडणुकींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप सोडून अन्य कुठल्याही पक्षाबरोबर युती करायला तयार आहे, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

याचा अर्थच महाविकास आघाडीचे काय व्हायचे ते होवो, ठाकरे बंधू एकत्र येवोत किंवा न येवोत, पवारांचे राष्ट्रवादी कुठल्या ना, कुठल्या मार्गाने सत्तेच्या वळचणीला जाऊन बसू पाहत आहे. त्यासाठी महाविकास आघाडी तोडून ठाकरेंच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला कोलदंडा घालून पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर युती करायला तयार झाली आहे.

– शिंदे आणि अजितदादा दूधखुळे आहेत का??

पण प्रश्न फक्त हाच आहे, की शरद पवारांनी आता कितीही “आयडियेच्या कल्पना” लढविल्या, तरी 2019 मध्ये हात आणि तोंड पोळलेला भाजप इतक्या सहजासहजी पवारांच्या डावपेचाला यशस्वी होऊ देईल का…?? त्याचबरोबर शरद पवारांसारख्या अविश्वासू नेत्याच्या नादी लागून एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपले राजकीय नुकसान करून घेतील का…??

Sharad Pawar proposes new alliance with Eknath Shinde and Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात