Sharad Pawar शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुद्धीचातुर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेचे, बुद्धीचातुर्याचे आणि राजकीय कौशल्याचे कौतुक केले आहे. Sharad Pawar

फडणवीस यांच्या ५५व्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या विशेष पुस्तकामध्ये शरद पवारांनी आपल्या भावना शब्दबद्ध केल्या असून, विरोधी गटातील प्रमुख नेत्याकडून मिळालेली ही स्तुती विशेष लक्षवेधी ठरत आहे. Sharad Pawar

‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून, राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत आपले विचार आणि अनुभव मांडले आहेत. त्यात शरद पवार यांचा लेख सर्वाधिक चर्चेत आहे.



पवार यांनी आपल्या लेखात नमूद केले आहे की, “देवेंद्र फडणवीस यांची कामाची गती आणि उरक मी जवळून पाहिला आहे. त्यांनी सत्तेत नसतानाही आपल्या बुद्धीचातुर्याने आणि प्रशासन कौशल्याने स्पष्टपणे आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची आठवण मला माझ्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळाची आठवण करून देते. ते माझ्या वयाचे होईपर्यंतही अशीच उर्जा आणि कार्यतत्परता कायम ठेवोत, हीच शुभेच्छा.”

याशिवाय पवार म्हणतात, “फडणवीस हे कायद्याचे पदवीधर असून, अत्यंत हजरजबाबी, संवादकुशल आणि तारतम्याने वागणारे नेते आहेत. त्यांच्या अशा गुणांमुळे त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जे नेतृत्व केले, ते उल्लेखनीय होते. सत्ता नसतानाही त्यांनी विरोधी बाकावरून जनतेचे प्रश्न अभ्यासपूर्वक मांडत प्रभावी भूमिका बजावली.”

राजकीय विरोधक असूनही देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीला शरद पवारांकडून मिळालेली ही खुलेआम स्तुती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. विशेषतः सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तणावपूर्ण असताना, अशा प्रकारचे उदात्त विधान राजकीय परिपक्वतेचे आणि सहिष्णुतेचे प्रतीक मानले जात आहे.

Sharad Pawar praises Chief Minister Devendra Fadnavis for his intelligence and efficiency

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात