Sharad Pawar : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल बोलले गडकरी; पवारांनी केली त्यांच्या अभ्यासाची स्तुती!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली/कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल बोलले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवारांनी केली त्यांच्या अभ्यासाची स्तुती!! Sharad pawar praise nitin gadkari

सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर डिसेंबर महिन्यामध्ये अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याच दुर्घटनेसंदर्भात अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत त्यांचे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जनतेची माफी मागितली. मात्र या प्रकरणावरुन विरोधकांनी राजकारण चालवले असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी स्टेनलेस स्टिलच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत शिवरायांचा पुतळा उभारताना स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर पुतळा पडला नसता, असे सांगितले. दिल्लीतील एका कार्यक्रमात गडकरींनी केलेल्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे.

नितीन गडकरी म्हणाले :

स्टेनलेस स्टिलचा वापर समुद्रकिनारी बांधकाम करताना करणे गजरेचे आहे. आपण मागील काही वर्षांपासून समुद्रकिनाऱ्यावरीस रस्ते आणि त्यावरचे उड्डाणपूल बांधताना स्टेनलेस स्टिलचा वापर केल्यास समुद्रावरुन येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यांमुळे गंज धरण्याची समस्या निर्माण होत नाही. बांधकाम भक्कम राहून दीर्घकाळ टिकते. महाराष्ट्रात 55 उड्डाण पूल बांधताना समुद्रकिनाऱ्यावरील उड्डाण पुलासाठीच्या सळ्यांवर कोटिंग पावरडर वापरल्यानंतरही सळ्यांना गंज चढत असल्याचे दिसून आले.

समुद्रकिनाऱ्यापासून 30 किलोमीटरच्या परिघामध्ये बांधकाम करताना स्टेनलेस स्टिलचा अधिक वापर केला पाहिजे. मलावणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर तो पुतळा कोसळला नसता.

पवारांची गडकरी स्तुती

केंद्रीय मंत्री असलेल्या गडकरींनी केलेल्या या विधानासंदर्भात आज कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांनी, नितीन गडकरी केंद्रातील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांनी एखादे काम हाती घेतले, तर ते मन लावून ते काम करतात. त्या कामाचा बारकाईने अभ्यास करतात. कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी ते (गडकरी) घेतात. देशातील अनेक रस्ते त्यांनी उत्तम पद्धतीने बांधलेत. आम्ही हे संसदेमध्येही मोकळेपणे सांगितलं आहे. गडकरींनी पुतळ्याच्या कामाबद्दल काही मत व्यक्त केलं असेल तर त्यांनी नक्कीच त्याचा अभ्यास केला असेल, असे शरद पवार म्हणाले.

Sharad pawar praise nitin gadkari

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात