पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जय बजरंग बली घोषणेला शरद पवारांचा आक्षेप

प्रतिनिधी

पंढरपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा पेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक सभेत जय बजरंग बली घोषणेने सुरुवात केल्यानंतर तिथे सभांमध्ये जोश भरतो आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जय बजरंग बली या घोषणेवर आक्षेप घेतला आहे.Sharad Pawar objects to Prime Minister Narendra Modi’s Jai Bajrang Bali slogan

भारताने धर्मनिरपेक्ष राज्यघटना स्वीकारली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी धर्माच्या आधारे कुठली घोषणा देणे हे देशासाठी चांगले नाही, असे मत शरद पवारांनी पंढरपूरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केले आहे. कर्नाटकात जनमत भाजप सरकारच्या विरोधात आणि काँग्रेसच्या बाजूने आहे, असा दावाही पवारांनी केला आहे.



त्याचवेळी त्यांनी देशभराचा नकाशा समोर मांडून भाजप कोठे नाही, याची जंत्रीच वाचली. केरळ, तामिळनाडू, आंध्र, तेलंगण मध्ये भाजप नाही. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यामुळे त्यांची सत्ता आहे. गुजरात मध्ये भाजप आहे. उत्तर प्रदेशात भाजप आहे. मध्य प्रदेशात कमालनाथ यांचे बहुमताचे सरकार होते, पण त्यांनी काँग्रेस फोडून स्वतःचे सरकार बनवले. दिल्लीत भाजप नाही. हरियाणातही भाजप नाही, असा दावा त्यांनी केला. मात्र यातला हरियाणातला त्यांचा दावा खोटा असून प्रत्यक्षात हरियाणामध्ये मनोहरलाल कट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार अस्तित्वात आहे.

तसेच कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा दावा पवारांनी केला असला तरी याच कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेसने 46 उमेदवार उभे करण्याचे जाहीर करून प्रत्यक्षात 9 उमेदवार उभे केले, त्यावर मात्र पत्रकारांनी पवारांना कुठला प्रश्न विचारला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तरही दिले नाही.

Sharad Pawar objects to Prime Minister Narendra Modi’s Jai Bajrang Bali slogan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात