विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्याच्या दिवशी शरद पवारांचे वेगळेच नियोजित कार्यक्रम, त्यामुळे मेळाव्याला फाऊल करण्यासाठी राहणार गैरहजर!! Sharad Pawar
ठाकरे बंधूंचा उद्या 5 जुलै 2025 रोजी ऐक्य मेळावा होतो आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. अर्थातच हे दोन बंधूच या मेळाव्याचे आकर्षण बिंदू आहेत त्यामुळे या दोन्ही बंधूंनी सर्वपक्षीय नेत्यांना जरी त्या मेळाव्यासाठी येण्याचे आवाहन केले असले, तरी सगळा फोकसच जर ठाकरे बंधूंवर राहणार असेल, तर इतर नेते त्या मेळाव्याला हजर राहण्याची शक्यताच नव्हती. त्यानुसार शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष सोडून बाकीच्या पक्षांच्या नेत्यांनी त्या मेळाव्यापासून अंतर राखणेच पसंत केले आहे. प्रकाश आंबेडकर या मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनीच जाहीर केले. Sharad Pawar
त्याचबरोबर शरद पवार देखील आपले नियोजित कार्यक्रम असल्यामुळे आपण मेळाव्याला हजर राहणार नाही, असे सांगून मोकळे झाले. मराठी विजय मेळाव्याचा सगळा फोकस ठाकरे बंधू यांच्या ऐक्यावर राहणार असल्याने आणि त्याचा अप्रत्यक्ष फटका महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना बसणार असल्याने पवारांनी स्वतःहून या मेळाव्यापासून स्वतःला दूर राखले. काँग्रेसने देखील आम्हाला मेळाव्याचे निमंत्रणच नाही तर आम्ही कशाला जायचे?, तो ठाकरे बंधूंचा वैयक्तिक कार्यक्रम आहे, असे सांगून त्या मेळाव्यापासून हात झटकले.
पण पवारांनी नियोजित कार्यक्रमाचे निमित्त सांगून ते मेळाव्यापासून बाजूला झाले असले, तरी मेळाव्याच्या ऐन वेळेला ते स्वतःचा एखादा कार्यक्रम लावून मराठी माध्यमांचे लक्ष मेळाव्यापासून विचलित केल्याशिवाय राहणार नाहीत. ते मेळाव्याला फाऊल केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, अशी मुंबईतल्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App