विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले आहे. तसेच यावेळी धर्मनिरपेक्षता जपण्याचे आवाहनही शरद पवारांनी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.Sharad Pawar
बैठकीत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे. ते म्हणाले, पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जाती-जातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. जातीय सलोखा ठेवा, स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर बोलत असताना जातिवाचक बोलू नका, बोलताना प्रेमाची भाषा वापरा, आपण करत असलेल्या विधानामुळे जातोय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.Sharad Pawar
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, राजकारणात जाती धर्मावर राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. लोकांच्या लोकप्रियतेपेक्षा ते जास्त महत्वाचे आहे. वाचाळवीर वाढले आहेत, दुदैव आहे कोणी कोणाकडून काय खरेदी करावे यावर सरकार गप्प बसते? सरकारचा त्याला पाठिंबा आहे का? दरी निर्माण केली जात असल्याचे देखील पवार म्हणाले.
राजकारणात तरुणांना संधी
राजकारणात तरुणांना संधी देण्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येतील यासाठी प्रयत्न करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आगामी काळात कशा प्रकारे युती करायची याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक पार पडणार असल्याची देखील माहिती बैठकीत देण्यात आली. येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत निर्णय करा, अशा सूचनाही शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच आपल्याकडे इच्छुकांची संख्या खूप आहे, काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. आज अल्पसंख्यांक समाजाचा निर्णय घेतला असेच युवक आणि युवतींचा निर्णय होणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
अतिवृष्टी संदर्भात राज्य सरकारकडून तुटपुंजी मदत
महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, अतिवृष्टी संदर्भात राज्य सरकार जी मदत करत आहे, ती तुटपुंजी आहे. केंद्रीय पथकाने येऊन पाहणी केली पाहिजे होती. आमच्या वेळेस केंद्रीय पथक येऊन पाहणी करून भरगोस मदत देत होते. नरसिंह राव जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते राज्यात अतिवृष्टीच्या पाहण्यासाठी येणार होते. पण, तेव्हा मीच त्यांना पाहण्यासाठी येऊ नका असे म्हटले. कारण, शासकीय यंत्रणा तुमच्या दौऱ्यासाठी लागेल, त्यामुळे मदतही होणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App