नाशिक : साहेब खडे तो सरकारसे बडे, एकाच दिवसात पवारांच्या घोषणेला हरताळ फासे!!, असं म्हणायचे वेळ नाशिक मधल्या असं म्हणायची वेळ नाशिक मधल्या आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मोर्चामुळे आली. आजच्या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व नेत्यांनी साहेबांचा पक्ष, साहेबांमुळे असं घडलं, साहेबांमुळे तसं घडलं, साहेबांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, अशी भाषणे करून गाजविला. पण या प्रत्येक भाषणातून शरद पवारांच्या कालच्या घोषणेलाच हरताळ फासला गेला. Sharad Pawar NCP
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरामध्ये समारोपच्या भाषणामध्ये सगळ्या नेत्यांना एक इशारा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपल्या सगळ्यांचा आहे. मी आत्तापर्यंत ऐकलेल्या भाषणांमध्ये सगळ्या वक्त्यांनी हा साहेबांचा पक्ष आहे, असे सांगितले, पण तसे सांगणे अजिबात योग्य नाही. हा पक्ष साहेबांचा नाही. कुणाही एका व्यक्तीचा नाही. आपल्या सगळ्यांचा पक्ष आहे. तुम्ही “साहेबांचा पक्ष” अशी प्रतिमा निर्माण करू नका. सगळे मिळून पक्षाला वाढवा, असे शरद पवार कालच म्हणाले होते.
पवारांचे कालचेच भाषण नेते विसरले
पण आजच्या शेतकरी मोर्चा च्या भाषणांच्या वेळी शरद पवारांच्या पक्षातले सगळे नेते पवारांचे कालचेच भाषण विसरले. पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तर फार पुढे निघून गेले. साहेब खडे तो सरकारसे बडे अशी घोषणाच त्यांनी दिली. नाशिक मध्ये फक्त आपला एक खासदार आहे पण एकही आमदार नाही. तरीही आजच्या मोर्चाला एवढा मोठा जनसागर आला आहे. याचा अर्थ साहेब खडे तो सरकारसे बडे, असे शशिकांत शिंदे म्हणाले. त्यामुळे सगळ्या वक्त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाची स्तुती करण्याभोवतीच आपली भाषणे केंद्रित ठेवली. पक्षाने लोकसभेची उमेदवारी नाकारलेले कराळे मास्तर यांनी गळ्यात भाज्यांच्या माळा घालून जोरदार भाषण केले. गांधी लढे थे गोरोंसे, हम लढेंगे चोरोंसे, अशी घोषणा त्यांनी दिली.
कांदा निर्यातीचा निर्णय घेऊन पवार साहेबांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला होता पण सध्याच्या सरकारने कांदा निर्यात बंदी आणून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा आरोप राजेश टोपे यांनी केला. शेतकऱ्यांच्या बहात्तर हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची आठवण अनिल देशमुख यांनी काढली. सुप्रिया सुळे यांनी सरकारला एक महिनाभर प्रेमाने विनंती करत राहू पण नंतर महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असा इशारा दिला.
शिवसेना + मनसेच्या मोर्चाला उत्तर
दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन नाशिक मध्ये मोठा मोर्चा काढला होता. त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला त्या मोर्चात सामील होण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिले नव्हते. ठाकरे बंधूंच्या ऐक्याभोवती तो मोर्चा फिरला होता.
त्याचप्रमाणे आजचा मोर्चा फक्त शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भोवतीच फिरला पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांना शेतकरी आक्रोश मोर्चा सामील व्हायचे निमंत्रण दिले नव्हते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App