शरद पवार सत्तेत सामील व्हायची हवा, की राज्यसभेसाठी नुसतीच हूल देताहेत का पाहा…??

नाशिक : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे दोन पक्ष आघाडी करण्याची शक्यता बळावली असतानाच मराठी माध्यमांनी शरद पवार सत्तेत सामील व्हायची हवा करत आहेत, अशा दावा करणाऱ्या बातम्या दिल्या त्यासाठी वेगवेगळी आणि भली मोठी कारणे सुद्धा दिली.

पण शरद पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाण्याची खरंच हवा करत आहेत, की राज्यसभेची स्वतःची सीट पुन्हा मिळवण्यासाठी नुसतीच हूल देताहेत??, हे पाहणे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे. कारण शरद पवारांनी आत्तापर्यंत अनेकांना अशाच हूल दिल्या आणि प्रत्यक्षात आपले वेगळेच काम साधून घेतले, असा इतिहास आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिकांमध्ये स्वतःचे स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी होणे ही पवार – काका पुतण्यांची गरज आहे. पुणे महापालिकेत तर दोन्ही काका – पुतणे एक होऊन सुद्धा त्यांची ताकद भाजपला टक्कर देण्याइतपत निर्माण होत नाही, त्यामुळे त्यांना तिथे काँग्रेसची गरज लागते आहे. म्हणूनच दोन्ही राष्ट्रवादीकडून स्वतः एकत्र यायचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेसची सुद्धा मनधरणी चालू आहे.

– मराठी माध्यमांचे तर्कट

पण या पार्श्वभूमीवर मराठी माध्यमांनी वेगळेच राजकीय तर्कट लावून महापालिकांच्या निवडणुकांचा संबंध थेट सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याशी जोडून टाकलाय, म्हणूनच शरद पवार भाजपच्या सत्तेशी जुळवून घेणार, असा दावा सुद्धा केलाय.

शरद पवारांना आपल्या मुलीचे राजकीय बस्तान बसवायचे आहे. त्यामुळे त्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाण्यापासून पर्याय नाही. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे अजित पवारांशी जुळवून घेऊन दुसरीकडे भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सहयोगी पक्ष बनणार. सुप्रिया सुळे यांना केंद्रात महत्त्वाचे खाते मिळणार. शरद पवार स्वतः निवृत्त होऊन बाजूला होणार. शरद पवारांना त्यासाठी आपल्या तत्त्वाशी किंचित तडजोड करावी लागली, तरी चालेल पण सगळ्या पक्ष आणि नेते राजकारणातून बाजूला फेकले जाण्यापेक्षा तडजोड करून भाजपशी जुळवून घेणे हेच राजकारण शरद पवार करतील, असा दावा काही मराठी माध्यमांनी केलाय.



– विश्वासघात हेच पवारांचे सूत्र

पण हा दावा करताना अनेकजण शरद पवारांच्या राजकारणाचे मूलभूत तत्त्व म्हणजे “राजकीय विश्वासघात” आहे, हेच विसरलेत. शरद पवारांनी अनेकदा भाजपला आणि बाकीच्यांना अशीच हूल दिली. त्यांनी बोट एकीकडे दाखविले आणि प्रत्यक्षात ते दुसरीकडे गेले, हा राजकीय इतिहास फार जुना नाही. तो नवाच आहे. याच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता, पण 2019 मध्ये भाजप नको. त्याऐवजी शिवसेना चालेल, असे सांगून त्यांनी शिवसेनेशी युती केली होती. त्याआधी त्यांनी अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घ्यायला लावून अवघ्या दोन दिवसांमध्ये त्यांना परत बोलवून भाजपला गंडवले होते. शरद पवारांनी अशा कोलांट्याउड्या अनेकदा मारल्या.

– शरद पवारांच्या गेमा

त्यामुळे आता शरद पवार भाजपबरोबर सत्तेमध्ये जातो अशी हूल देत नाहीत कशावरून?? किंवा भाजप बरोबरच्या सत्तेत येतो, पण सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी स्वतःसाठीच राज्यसभेची सीट सुरक्षित करून ठेवतो, असा डाव शरद पवार खेळत नसतील कशावरून?? कारण शरद पवारांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत एप्रिल – मे 2026 मध्ये संपत आहे. त्यांना पुन्हा राज्यसभेवर जायचे असेल, तर त्यांच्या आमदारांची संख्या पुरेशी नाही त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि भाजपची मदत लागू शकते. त्यामुळे भाजपची आणि अजितदादांची मदत मिळण्यासाठी पवार सध्याच्या गेमा करत नसतील ना, असे कुणाला ठामपणे सांगता येणार नाही.

Sharad Pawar may again deceive BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात