Sharad Pawar : Z Plus सुरक्षा पवारांनी नाकारल्याचा नुसताच गवगवा; प्रत्यक्षात पवारांचा 2 ते 6 सप्टेंबरचा त्याच सुरक्षेत दौरा!!

Sharad pawar

विशेष प्रतिनिधी

Sharad pawar  : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे अध्यक्ष शरद पवारांना केंद्राने दिलेल्या “झेड प्लस” सुरक्षेवरून खुद्द पवारांनी संशय व्यक्त केल्यानंतर मराठी माध्यमांनी त्या सुरक्षा व्यवस्थेचा गवगवा केला. पण शरद पवारांचा महाराष्ट्रातला 2 ते 6 सप्टेंबर या काळातील दौरा “झेड प्लस” सुरक्षेसहच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या “झेड प्लस” सुरक्षा व्यवस्थेबाबत शरद पवारांनी शंका व्यक्त करून माध्यमांमध्ये बातम्यांची राळ उडवून दिली होती. वास्तविक अशाच “झेड प्लस” कॅटेगिरीची सुरक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनाही केंद्र सरकारने दिली. ती अंमलातही आणली. त्याबद्दल माध्यमांमध्ये कुठला गवगवा झाला नाही.

पण पवारांनी मात्र “झेड प्लस” सुरक्षेवरून आपल्यावर पाळत ठेवल्याची शंका व्यक्त करून मराठी माध्यमांमध्ये बातम्यांची राळ उडवून दिली होती.


Tejashwi Yadav : सॅम पित्रोदा यांचा आत्मा तेजस्वी यादवमध्ये आहे का? – भाजपचा टोला!


प्रत्यक्षात सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांची दिल्लीतील शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये गृह खात्याचे अधिकारी, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अधिकारी, दिल्ली पोलिस, वाहतूक पोलिस शाखा, अग्निशमन दल, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि दिल्ली महापालिका यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी सहभागी होते. या बैठकीमध्ये “झेड प्लस” सुरक्षेबाबत शरद पवारांना माहिती दिली. तसेच या सुरक्षेसंदर्भात काही सूचना देखील करण्यात आल्या होत्या. मात्र, कोणत्या कारणामुळे ही सुरक्षा दिली जात आहे, याचा तपशील सुरक्षा यंत्रणांनी सांगितला नसल्याचा दावा पवार यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील व्यक्तींनी केला. यासंबधीचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले होते.

पण सुरक्षा दलाच्या ताफ्याची तैनात निवासस्थानाच्या आतमध्ये करण्यात येऊ नये, सुरक्षा यंत्रणांच्या सांगण्यानुसार आपले खासगी वाहन बदलले जाणार नाही. वाहनामध्ये देखील दोन सुरक्षारक्षक नेमले जाऊ नये, असे देखील पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले होते. यांच्या निवासस्थानाच्या कुंपणाच्या भिंतीची उंची वाढवण्याची आवश्यकता सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यासाठी पाहणी देखील करण्यात आली होती, असे मराठी माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सुरक्षा व्यवस्था स्वीकारली की नाकारली याची माध्यमांनी उलटसुलट चर्चा केली तरी प्रत्यक्षात शरद पवारांचा 2 ते 6 सप्टेंबर या काळात होणारा मुंबई ते कोल्हापूर दौरा “झेड प्लस” सुरक्षा कवचाखाली होणार आहे.

Sharad Pawar maharashtra tour in Z+ security

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात