विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांचे आमदार पात्र, पण कायद्याच्या कसोटीवर शरद पवारांनी गमावला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष!!, असा आजच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचा कायदेशीर अर्थ आहे. Sharad Pawar lost the original NCP party on the test of law
निवडणूक आयोगाने आधीच शरद पवारांचा मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला देऊन त्यांचाच मूळ पक्ष असल्याचे मान्य केले. विधानसभा अध्यक्षांनी देखील निवडणूक आयोगाचा हा निकाल प्रमाण मानून विधिमंडळातल्या पात्र – अपात्रतेचा निर्णय दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या संख्येपैकी तब्बल 41 आमदार अजित पवार यांच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याचे या निकालाने सिद्ध केले त्यामुळे अजित पवार गटाकडे नेमके किती आमदार आणि शरद पवार गटाकडे नेमके किती आमदार याचा दोन्ही नेत्यांनी ठेवलेला संभ्रम विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे दूर झाला.
विधानसभा सदस्यांची संख्या पाहता 41 आमदारांचे पाठबळ अजित पवार गटाकडे दिसते. त्यामुळे अजित पवार यांना विधीमंडळ गटाचा पाठिंबा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असणारे सर्व आमदार अपात्र होत नाहीत.
तसेच केवळ पक्षाच्या आमदारांचे बहुमत आमच्याकडे आहे म्हणून घटना सूचीच्या दहाव्या कलमानुसार विरोधी गटाचे आमदारांना अपात्र करा, असे बहुमतवाल्या गटाचे नेते अल्पमतातल्या गटाच्या आमदारांना धमकावू शकत नाहीत किंवा अध्यक्षांच्या निकालाचा वापर आपल्या पक्षांतर्गत वादामध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी करवून घेऊ शकत नाहीत, असा स्पष्ट निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यामुळे शरद पवार गटाचे ही आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरविले.
विधिमंडळातला मूळ पक्ष कोणता आणि सदस्यांचे नेमके अधिकार आणि कर्तव्य काय याविषयीच विधानसभा अध्यक्ष निर्णय देऊ शकतात. त्यापलीकडे पक्षांतर्गत शिस्तभंग अथवा राजकीय वैर यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा वापर कोणतेही राजकीय पक्ष करू शकत नाहीत, असे राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालातून स्पष्ट केले.
पक्षांतर्गत मतभेद, नेतृत्व बदलाची मागणी अथवा दोन गटांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप यांचा विधानसभा अध्यक्षांच्या निकालाशी काहीही संबंध नाही. विधानसभेचे सदस्य त्यांचे कर्तव्य पार पाडतात की नाही, ते नियमानुसार आहे की नाही, त्यांचे हक्क अबाधित आहेत की नाही याविषयी विधानसभा अध्यक्ष निर्णय देऊ शकतात. तो निकाल आपण दिला आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवाताना राहुल नार्वेकर यांनी पक्षघटना, नेतृत्व रचना आणि विधिमंडळ बहुमताचा विचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधील आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अश्यावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचे आहे, असे नार्वेकर म्हणाले. आपलाच अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांनी समांतर दावे केले. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींच्या निवडणुकीचे कायदेशीर पुरावे शरद पवार गटाने सादर केले नाहीत.
पक्षाचा अध्यक्ष कोण हे विधानसभेचे अध्यक्ष ठरवू शकत नाहीत. अध्यक्षपदाची निवड पक्षाच्या घटनेला धरुन नाही, असा दावा दोन्ही गटांनी केला. पण 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हते. पण 30 जून 2023 रोजी दोन नेत्यांनी अध्यक्षपदाचा दावा केला. पक्षाचा अध्यक्ष मी ठरवू शकत नाही. त्यामुळे विधिमंडळ बहुमतावर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हा निर्णय द्यावा लागेल.
Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar dismisses the disqualification application by the Sharad Pawar faction against the Ajit Pawar faction. The Speaker rules it was not defection, Ajit Pawar and others' actions and statements between 30th June and 2nd July last year were… — ANI (@ANI) February 15, 2024
Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar dismisses the disqualification application by the Sharad Pawar faction against the Ajit Pawar faction. The Speaker rules it was not defection, Ajit Pawar and others' actions and statements between 30th June and 2nd July last year were…
— ANI (@ANI) February 15, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा, आमदारही पात्र –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहेत. हे बहुमत शरद पवार गटाकडे नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असणारे सर्व आमदार पात्र ठरतील. शरद पवार गटाने दाखल केलेली याचिका विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली.
पात्र ठरणारे 41 आमदार कोणते ?
१.सरोज अहिरे २.धर्माबाबा आत्राम ३.बाळासाहेब अजबे ४.राजू कारेमोरे ५.आशुतोष काळे ६.माणिकराव कोकाटे ७.मनोहर चांद्रिकेपुरे ८.दीपक चव्हाण ९.संग्राम जगताप १०.मकरंद पाटील ११.नरहरी झिरवाळ १२.सुनील टिंगरे १३.अदिती तटकरे १४.चेतन तुपे १५.दौलत दरोडा १६.राजू नवघरे १७.इंद्रनील नाईक १८.मानसिंग नाईक १९.शेखर निकम २०.अजित पवार २१.नितीन पवार २२.बाबासाहेब पाटील २३.अनिल पाटील २४.राजेश पाटील २५.दिलीप बनकर २६.अण्णा बनसोडे २७.संजय बनसोडे २८.अतुल बेनके २९.दत्तात्रय भरणे ३०.छगन भुजबळ ३१.यशवंत माने ३२.धनंजय मुंडे ३३.हसन मुश्रीफ ३४.दिलीप मोहिते ३५.निलेश लंके ३६.किरण लहमते ३७.दिलीप वळसे ३८.राजेंद्र शिंगणे ३९.बबनराव शिंदे ४०.सुनील शेळके ४१.प्रकाश सोळंके
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App