नाशिक : बारामती आणि माळेगाव या नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारापासून अजून तरी सुप्रिया सुळे दूर आहेत कारण इथेही शरद पवारांनी Game केली आहे. Sharad Pawar
बारामती आणि माळेगाव नगरपरिषदांच्या निवडणुकीत प्रथमच काका आणि पुतण्यांचे वेगवेगळे पॅनेल एकमेकांच्या समोर उभे राहिलेय. या आधीच्या निवडणुकांमध्ये पवार काका पुतणे एक होते तेव्हा या नगरपरिषदांच्या निवडणुका केव्हा व्हायच्या आणि त्यातून कोण निवडून यायचे??, याची साधी भनकही बाहेर कुणाला लागायची नाही. तिथे फक्त पवार काका पुतण्यांची चर्चा चालायची तेच उमेदवार ठरवून परस्पर निवडणुका घेऊन मोकळे व्हायचे. Sharad Pawar
पण 2025 मध्ये काका – पुतणे एकमेकांविरुद्ध उतरल्याने या दोन गावांमधल्या नगरपरिषदांच्या निवडणुका निदान सार्वजनिक चर्चेत तरी आल्यात. बारामती नगर परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवारांचे नाव घेता गंभीर आरोप केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन माघार घ्यायला लावली म्हणून अजित पवारांचे उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकले, असा दावा युगेंद्र पवार यांनी केला. त्यामुळे बारामतीची निवडणूक माध्यमांमधून गाजायला लागली. Sharad Pawar
पण त्या पलीकडे जाऊन शरद पवारांनी इथे Game केली. ते स्वतः किंवा खासदार सुप्रिया सुळे अजून प्रचारात उतरलेच नाहीत. बारामतीच्या निवडणुकीची सूत्रे खरं म्हणजे शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या हाती द्यायला हवी होती. पण त्यांनी पण त्यांनी ती सूत्रे युगेंद्र पवारांच्या हाती दिली. युगेंद्र पवारांनीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलची पत्रकार परिषद घेतली. त्यांनी त्या पत्रकार परिषदेतून काही उमेदवार जाहीर केले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आणि भाजपवर वेगवेगळे आरोप केले. काल ते स्वतः प्रचारात सुद्धा सहभागी झाले. पण सुप्रिया सुळे मात्र या दरम्यान प्रचारात कुठे दिसल्या नाहीत. सुप्रिया सुळे यांना पवारांनी सध्या तरी स्थानिक निवडणुकीतल्या प्रचारापासून दूर ठेवलेय.
– साखर कारखान्यांच्या निवडणुकीपासूनही सुप्रिया दूर
याआधी बारामती तालुक्यातल्या वेगवेगळ्या साखर कारखान्यांचे निवडणुकीत पवारांनी सुप्रिया सुळे यांना दूरच ठेवले होते. कारण तिथे मुकाबला अजित पवारांशी होता. पवारांना त्या मुकाबल्यात कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. अजित पवारांच्या विरोधात स्थानिक निवडणुकीत सुप्रिया सुळे पराभूत झाल्या, हा डाग त्यांना लावून घ्यायचा नव्हता. त्यामुळे पवारांनी चतुराईने साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या धबडग्यातून सुप्रिया सुळे यांना दूर ठेवले होते.
– पराभवाचा डाग लागण्याची भीती
नेमकी हीच चतुराई पवारांनी बारामती आणि माळेगाव नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये वापरली. या दोन्ही नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा मुकाबला अजित पवारांशीच आहे. या निवडणुकांची सूत्रे सुप्रिया सुळे यांच्या हाती दिली, त्यांना प्रचार करायला लावला आणि तरीही या निवडणुकांमध्ये पराभव झाला, तर तो ठपका सुप्रिया सुळे यांच्यावर बसेल, या भीतीपोटी पवारांनी सुप्रिया सुळे यांना या निवडणुकीच्या धबडग्यातून बाजूला काढले. त्यांच्या ऐवजी अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्या हाती नगरपरिषदांच्या स्थानिक निवडणुकीची सूत्रे सोपविली. म्हणजे जिंकले, तर अजित पवार आणि पराभव झाला तरी त्यांच्या सख्ख्या पुतण्याचा, हे चित्र निर्माण होईल आणि सुप्रिया सुळे पराभवाच्या ठपक्क्यापासून वाचू शकतील, असा शरद पवारांचा राजकीय होरा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App