विशेष प्रतिनिधी
मुंबईः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. ‘Sharad Pawar is the greatest leader of Maharashtra after Yashwantrao Chavan’ – Sanjay Raut
शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संजय राऊत यांनीही शरद पवारांना वाढविसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यावेळी ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, ८१ वर्षांनंतरही शरद पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील, असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत. त्यांनी कृषी, संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार आहेत, असं राऊत म्हणाले.
आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यानिमित्त संजय राऊत यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असं ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App