भुजबळांनी उलगडले बंडाचे “रहस्य”; शरद पवार आमचे गुरु, गुरुपौर्णिमेलाच त्यांना दिली सत्तेची गुरुदक्षिणा!!


प्रतिनिधी

मुंबई : खरी राष्ट्रवादी कोणाची शरदनिष्ठ की अजितनिष्ठ??, या वादात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अजितदादांच्या कथित बंडाचे रहस्य उलगडले. शरद पवार आमचे गुरु आहेत आणि त्यांना गुरु पौर्णिमेलाच आम्ही सत्तेची गुरुदक्षिणा दिली, असे वक्तव्य करून अजित दादांच्या कथित बंडाला शरद पवारांचा आशीर्वाद असल्याचे छगन भुजबळ यांनी सूचित केले.Sharad Pawar is our Guru, Gurudakshina of power was given to him only on Gurupurnima

शरद पवारांचा आदेश धुडकावून अजितदादांच्या मेळाव्यात भुजबळांच्या एमईटीत शरद पवारांची पोस्टर्स लावली. त्याचवेळी 41 आमदार अजितदादा गटात असल्याचा सुनील तटकरे यांनी दावा केला. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी शरद पवारांना आपले गुरु संबोधले. शरद पवार आमच्या सर्वांचे गुरु आहेत. त्यांच्याकडूनच आम्ही भरपूर काही शिकलो. अजितदादांना उपमुख्यमंत्री करून शरद पवारांना आम्ही सत्तेची गुरुदक्षिणा दिली, अशा शब्दांत भुजबळांनी शरद पवारांची पोस्टर्स लावण्याचे समर्थन तर केलेच, पण अजितदादांच्या कथित बंडाचे आणि त्या बंडाला शरद पवारांचा आशीर्वाद असल्याचे रहस्य देखील उलगडून टाकले.अजितदादांच्या मेळाव्यात पवारांची पोस्टर्स

आज 5 जुलैच्या शक्तिप्रदर्शनात अजित पवार गटाने शरद पवारांचा आदेश धुडकावून त्यांची पोस्टर्स छगन भुजबळांच्या एमईटी या मेळावास्थानी झळकवली. अजित पवार गटात 41 आमदार असल्याचा दावा त्यांनी नेमलेले प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला.

 बाळासाहेब विरुद्ध राज

बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा राज ठाकरे यांना आपली पोस्टर्स लावू नये असे खडसावले होते त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या ऐकून बाळासाहेबांची पोस्टर्स मनसेच्या कार्यक्रमात लावणे बंद केले होते पण अजितदादांनी पवारांनी तसाच इशारा देऊन देखील शरद पवारांची पोस्ट जळकावणे बंद केलेले नाही त्यामुळेच शरद पवार “डबल गेम” खेळत असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आणि महाराष्ट्रात पसरला आहे.

 83 वर्षांचा योद्धा

83 वर्षांचा योद्धा निघाला अशी पोस्टर्स शरद पवार गटाने अजित पवारांच्या मार्गावर झळकवली आहेत पण त्यातून अजित पवारांच्या गटाला काही फरक पडलेला नाही त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या गटात 41 आमदार असल्याचा दावा करून सिल्वर उपवर शरद पवारांना भेटायला गेलेले आमदार देखील आमच्या बैठकीला येतील, असा दावा केला आहे.

माझ्या हयातीत माझ्या परवानगीशिवाय पोस्टर्स लावू नयेत असे शरद पवारांनी कालच अजितदादांना खडसावले होते. पण अजितदादांनी कालही त्यांचे ऐकले नव्हते. राष्ट्रवादीच्या विधिमंडळ कार्यालयात अजित दादांनी शरद पवारांचे पोस्टर लावले आणि आजही छगन भुजबळांच्या मध्ये आमदारांच्या बैठकीसाठी सजवलेल्या स्टेजवर शरद पवारांची पोस्टर्स लावली. या स्टेजवर आमदारांसाठी 32 खुर्च्या मांडल्याची बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

Sharad Pawar is our Guru, Gurudakshina of power was given to him only on Gurupurnima

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात