विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांच्या मनात नेमके कोण मुख्यमंत्री आहेत, हे सगळ्यांना “कळले.” ते सगळ्यांना माहिती देखील आहेत, पण कुणीच “ते” नाव अधिकृतरित्या नाही घेतले. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या मनात नसलेल्या मुख्यमंत्र्यांचे नाव एका मुलाखतीत सांगून टाकले. ते नाव उद्धव ठाकरेंचे होते!! Sharad pawar has no intention to make uddhav thackeray CM!!
टीव्ही 9 मराठी एन्क्लेव्ह मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर सविस्तर भाष्य केले.
महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांनी पण मुख्यमंत्री ठरवलेले नाहीत. फक्त उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या नावाचा आग्रह धरला. त्यासाठी ते सोनिया गांधी यांना भेटून आले. पण त्या भेटीचा काही उपयोग झाला नाही. काँग्रेसने त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले नाही, असे सांगून फडणवीस म्हणाले, शरद पवारांच्याही मनात दोन तीन नावे मुख्यमंत्री पदासाठी फिक्स आहेत. पण मी एक नाव सांगू शकतो, ते नाव मात्र मुख्यमंत्री म्हणून निश्चितच पवारांच्या मनात नाही, ते म्हणजे उद्धव ठाकरे!!
Maharashtra : महाराष्ट्रात तब्बल 1 लाख 17 हजार कोटी गुंतवणुकीचे मेगा प्रोजेक्ट्स, महायुती सरकारची मान्यता
– सुप्रिया सुळेंचे नाव, पण समर्थनाचे काय??
शरद पवारांच्या मनामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एक नाव निश्चित आहे. त्यांना आपली कन्या सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करायची आहे. पण पवार देखील सुप्रिया सुळेंचे नाव उघडपणे घेत नाहीत. कारण त्यांनी तेलनाव घेतले की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कॉनर्स मधून घराणेशाहीच्या महिला मुख्यमंत्री म्हणून विरोध सुरू होईल, याची भीती पवारांना वाटत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. म्हणून पवार उघडपणे सुप्रिया सुळे यांचे नावच घेत नाहीत. ते स्वतःच नाव घेत नाही म्हणून त्यांच्या पक्षातले वरिष्ठ नेतेही जाहीरपणे सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे करत नाही. त्यांचे नाव फक्त पोस्टरवर त्यांचे समर्थक भावी मुख्यमंत्री म्हणून लावतात. त्या पलीकडे सुप्रिया सुळे यांच्या नावाला समर्थन मिळताना दिसत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App