विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला आता ‘तुतारीवाला माणूस’ हे नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात गुरुवारी रात्री आदेश जारी केले. यात म्हटले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत व आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला ‘तुतारीवाला माणूस’ (Man Blowing Truha) हे चिन्ह वापरण्याचे आदेश दिले आहेत. Sharad Pawar group gets ‘Tutari’ symbol; Announcement of Central Election Commission
"एक तुतारी द्या मज आणुनिफुंकिन मी जी स्वप्राणानेभेदुनि टाकिन सगळी गगनेदीर्घ जिच्या त्या किंकाळीनेअशी तुतारी द्या मजलागुनी!" “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN — Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
"एक तुतारी द्या मज आणुनिफुंकिन मी जी स्वप्राणानेभेदुनि टाकिन सगळी गगनेदीर्घ जिच्या त्या किंकाळीनेअशी तुतारी द्या मजलागुनी!"
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
पक्षाच्या अधिकृत पेजवर काय म्हटले…!
एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!”
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ असे नाव दिले होते. त्यानंतर आता पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. वटवृक्षासह अन्य दोन चिन्हांचा पर्याय शरद पवार गटाने मागितल्याची माहिती होती. पण आयोगाने तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिले.
राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टात या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं होतं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App