विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांचे शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादीतून निलंबन केले. याचा राजकीय अर्थ असा की, राष्ट्रवादी काँग्रेस मधला संघर्ष तसाच पुढे चालू राहिला तरी देखील कोणत्याही परिस्थितीत अजितदादांसह 9 मंत्र्यांची आमदारकी वाचली आहे शिवसेनेतील संघर्षासारखा 16 आमदारांच्या निलंबनाचा हा मुद्दा नाही. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात असेपर्यंत अजितदादा आणि त्यांच्याबरोबरचे मंत्री सरकारमध्ये राहतील हे शरद पवारांनी कारवाईनंतर देखील “सुनिश्चित” करून घेतले आहे. Sharad pawar expelled ajit pawar and 8 NCP ministers from his NCP, “saved” their assembly membership
मात्र अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या 8 मंत्र्यांच्या निलंबरनाबाबत पत्रकारांनी नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत, तुम्ही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची आमदारकी वाचवली का??, या प्रश्नाला शरद पवारांनी झटकून टाकले. “वह जादा कोई बात नही” एवढेच सांगून शरद पवारांनी त्या प्रश्नाची बोळवण केली.
शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन त्यामध्ये पक्षाने आठ ठराव मंजूर केले पक्षाच्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या 22 युनिट्सने शरद पवारांना पाठिंबा दिल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस पी. सी. चाको यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेत 16 आमदारांच्या निलंबनावरून जो घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे तो घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करणे शरद पवारांनी खुबीने टाळले.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचे पत्र दिले. ही केस विधानसभा अध्यक्षांकडे आजही पेंडिंग आहे. तसेच शिवसेनेचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय देखील खुला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह असलेल्या 15 आमदारांवर आजही अपात्रतेची टांगती तलवार आहे. विधानसभा अध्यक्षांनी या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय ठाकरेंना अनुकूल दिला, तर एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल आणि विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंना अनुकूल निर्णय दिला तर ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि सुप्रीम कोर्टाने जर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय फेटाळून एकनाथ शिंदे यांना प्रतिकूल निर्णय दिला तरी देखील एकनाथ शिंदे यांची आमदारकी आणि त्या पाठोपाठ मुख्यमंत्रीपद जाऊ शकते.
शरद पवारांनी नेमकेपणाने हीच बाब टाळली आहे. त्यांनी स्वतःहून शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजितदादा आणि त्यांच्याबरोबरचे आठ सहकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून निलंबित केल्याने कायदेशीर दृष्ट्या त्यांची आमदारकी टिकते आणि आमदारकी टिकल्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात असेपर्यंत आणि त्यांचे भाजपबरोबरचे अजितदादांचे भाजपबरोबर असे डील कायम असे पर्यंत सर्वांचे मंत्रिपद कायम राहू शकते, हे शरद पवारांना पक्के माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार आणि त्यांच्या साथीदारांना निलंबित केले आहे. हा यातला सर्वात कळीचा मुद्दा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App